विद्यार्थिनीवरील अत्याचाराची दोन समित्यांकडून चौकशी
By admin | Published: October 13, 2014 05:22 AM2014-10-13T05:22:56+5:302014-10-13T05:22:56+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शनिवारी सायंकाळी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सत्यशोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शनिवारी सायंकाळी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सत्यशोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. समितीत माजी न्यायमूर्ती एस़ सी़ मालते, कुलसचिव प्रा़ ए़ एम़ महाजन, उपकुलसचिव (कायदा व माहितीचा अधिकार) अॅड. एस़ आऱ भादलीकर, अॅड़ सुशील अत्रे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ़ गौरी राणे यांचा समावेश आहे. कुलगुरु प्रा. डॉ. सुधीर मेश्राम यांनी रविवारी ही माहिती दिली.
महिला लैंगिक छळ तक्रार निवारण समितीकडे देखील हे प्रकरण सोपविण्यात आले आहे़ विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणाचा तपास अधिक व्यापक होण्याच्या दृष्टीने सत्यशोधन समितीमध्ये विद्यार्थी संघटनांचा प्रतिनिधी, महिला दक्षता समिती सदस्य आणि ज्येष्ठ पत्रकाराचा समावेश करण्याची सूचना कुलगुरूंनी मान्य केली. समिती पंधरा दिवसांत तपास पूर्ण करेल, असेही कुलुगुरूंनी सांगितले.
अला अब्देल भेटल्याचे मान्य दीड महिन्यांपूर्वी अला अब्देल हा मला भेटण्यासाठी आला असल्याचे कुलगुरूंनी मान्य केले. तो परवीनसोबत आला होता़ तिला शिक्षक भवनात राहण्यासाठी सवलत देण्याची मागणी तो करीत होता़ मात्र हा विद्यार्थी विद्यापीठात आला कसा, हा कोण ?, अशी विचारणा करत तो उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संबंधीत नसल्याने त्याला हाकलून दिल्याचे प्रा़ मेश्राम यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)