खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीः सुभाष देसाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 06:03 PM2021-07-02T18:03:23+5:302021-07-02T18:04:21+5:30

कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची झाल्याची पटोलेंनी केली होती तक्रार. 

Inquiry into Mining Tender Case by Divisional Commissioner maharashtra minister Subhash Desai | खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीः सुभाष देसाई

खनिकर्म निविदा प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशीः सुभाष देसाई

googlenewsNext
ठळक मुद्देकोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची झाल्याची पटोलेंनी केली होती तक्रार. 

खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजेनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची देसाई यांनी  तत्काळ दखल घेऊन उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह यांना पुढील कारवाईचे निर्देश दिले. 

त्यानुसार शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपुरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांची एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितील एक महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. या संदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. दरम्यान, महजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title: Inquiry into Mining Tender Case by Divisional Commissioner maharashtra minister Subhash Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.