आयएनएस विराट युद्धनौकेचे होणार संग्रहालय ?

By admin | Published: November 19, 2015 02:52 AM2015-11-19T02:52:05+5:302015-11-19T02:52:05+5:30

आयएनएस विक्रांत युध्दनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर या नौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले होते. आता या युध्दनौकेनंतर आयएनएस विराट या विमानवाहूक

INS Viraat will be the museum? | आयएनएस विराट युद्धनौकेचे होणार संग्रहालय ?

आयएनएस विराट युद्धनौकेचे होणार संग्रहालय ?

Next

मुंबई : आयएनएस विक्रांत युध्दनौका नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर या नौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले होते. आता या युध्दनौकेनंतर आयएनएस विराट या विमानवाहूक युध्दनौकेचेही संग्रहालय करण्याचा प्रस्ताव नौदलाकडून तयार करण्यात आला आहे. ही युध्दनौका २0१६ मध्ये नौदलाच्या सेवेतून बाद होणार आहे. त्यामुळेच या युध्दनौकेचे संग्रहालय साकारण्याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले.
आयएनस विराट युध्दनौका ब्रिटनच्या रॉयल नेव्हीमध्ये १८ नोव्हेंबर १९५९ साली दाखल झाली. रॉयल नेव्हीमध्ये ती एच.एम.एस हर्मीस या नावाने ओळखली जात होती. भारताने ब्रिटनकडून ती १९८७ साली विकत घेतली. प्रदीर्र्घ सेवेनंतर ही युध्दनौका २0१६ मध्ये सेवेतून कमी केली जाणार आहे. या नौकेचे रूपांतर संग्रहालयात झाल्यास मुंबईतील नौदलाच्या गोदीत ही नौका उभी करायची की अन्य ठिकाणी, यावरही निर्णय होईल.

पर्रीकरांनी सूतोवाच केल्यानंतर हालचालींना वेग
आयएनएस कोचीच्या राष्ट्रापर्ण करण्याच्या मुंबईतील नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही म्युझियम करण्याचा विचार केला जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर या हालचालींना वेग आला.


ही सेवेतून कमी झाल्यानंतर युध्दनौकेबाबत तीन ते चार पर्याय समोर ठेवण्यात आले असून त्यातील म्युझियमचा एक पर्याय आहे.
- कमांडर राहुल सिन्हा (संरक्षण- मुख्य जनसंपर्क अधिकारी)-

Web Title: INS Viraat will be the museum?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.