मराठवाड्याची नियोजनाविना दुष्काळ पाहणी
By admin | Published: November 19, 2015 01:35 AM2015-11-19T01:35:29+5:302015-11-19T01:35:29+5:30
दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याची शनिवारपासून केंद्रीय पथकाकडून पाहणी
औरंगाबाद : दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्याची शनिवारपासून
केंद्रीय पथकाकडून पाहणी
केली जाणार असून नियोजनाअभावी त्याचा शेतकऱ्यांना कितपत
फायदा होईल, असा प्रश्न विचारला जात आहे.
खरीप हंगाम वाया गेलेल्या शेतकऱ्यांना ३ हजार कोटी रुपयांची मदत शासन देईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यातील पीक, पाणी, चाराटंचाईची २० व २१ नोव्हेंबरला केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. गुरुवारी सायंकाळी केंद्रीय फलोत्पादन विभागाचे आयुक्त मल्होत्रा यांच्यासह अधिकारी शहरात दाखल होतील,
असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले. आॅगस्टमध्ये पथकाने नियोजनबद्ध पाहणी केली होती. समिती सदस्यांच्या सोयीनुसार पथक थांबेल आणि पाहणी केली जाईल.
आॅगस्टमधील दुष्काळ पाहणीचा अहवाल केंद्र व राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यावेळी समितीने काही घटकांचे मूल्यांकन केले. शासनस्तरावरून अहवाल व उपाययोजनांप्रकरणी निर्णय होणार होता. अजून त्यावर निर्णय झालेला नाही. (प्रतिनिधी)