खारघरमधील नालेसफाईची आयुक्तांकडून पाहणी

By admin | Published: June 8, 2017 02:44 AM2017-06-08T02:44:05+5:302017-06-08T02:44:05+5:30

मान्सूनपूर्व कामाची बुधवार, ७ जून रोजी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

Inspector of Nalassife Commissioner Kharghar | खारघरमधील नालेसफाईची आयुक्तांकडून पाहणी

खारघरमधील नालेसफाईची आयुक्तांकडून पाहणी

Next

पनवेल : खारघर शहरातील मान्सूनपूर्व कामाची बुधवार, ७ जून रोजी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सिडको अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. पावसाळा तोंडावर आला असताना नालेसफाई कितपत पूर्ण झाली आहे यासंदर्भात आयुक्तांनी स्वत: रस्त्यावर उतरून ठेकेदारांना जाब विचारात नालेसफाई करून घेतली. या वेळी खारघर शहरातील नगरसेवक त्यांच्यासोबत होते.
या पाहणी दौऱ्यापूर्वी खारघरमधील नागरिकांशी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी खारघरमधील सिडको विभागीय कार्यालयात संवाद साधत यावेळी शहरात भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांबद्दल नागरिकांनी आयुक्तांसमोर गाऱ्हाणे मांडले. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे शहरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, कचऱ्याची समस्या, वाहतुकीची समस्या, अनधिकृत झोपडपट्टी आदी प्रश्न नागरिकांनी या वेळी विचारले. विशेष म्हणजे खारघर सेक्टर १० मध्ये कोपरा खाडीत सोडल्या जाणाऱ्या विनाप्रक्रि या केमिकलचा अशुद्ध पाण्याचा उग्र वास येथील रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचे प्रभाग क्र मांक ६ चे नगरसेवक अ‍ॅडव्होकेट नरेश ठाकूर यांनी आयुक्तांना सांगितले. नागरिकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आयुक्तांनी उत्तर देत शहरात सार्वजनिक शौचालय उभारणार असल्याचे सांगितले. यामध्ये महिलांसाठी विशेष शौचालये उभारणीचा प्रस्ताव महानगरपालिका तयार करणार आहे. दरम्यान, शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी डोअर टू डोअर कचरा कलेक्ट करण्यासंदर्भात मायक्र ो प्लॅन तयार करीत असल्याचे आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले. डस्टबीन फ्री शहर बनविणार असल्याचेही या वेळी आयुक्तांनी सांगितले. खारघर शहरातील विविध सेक्टरमधील नालेसफाईची पाहणी केली.
>आयुक्तांसमोर हंडा मोर्चा
शहरात कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा याविरोधात महिलांनी भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणीस बिना गोगारी यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा आयुक्त डॉ. शिंदे यांच्यासमोरच सिडकोवर काढला होता. यावेळी आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना राबविल्या जातील असे आश्वासन दिले.

Web Title: Inspector of Nalassife Commissioner Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.