सुरक्षिततेसाठी तातडीने हालचाली

By admin | Published: January 17, 2017 02:05 AM2017-01-17T02:05:08+5:302017-01-17T02:05:08+5:30

वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी आगार प्रशासनाला जाग आली.

Instant movements for security | सुरक्षिततेसाठी तातडीने हालचाली

सुरक्षिततेसाठी तातडीने हालचाली

Next

नेहरूनगर : पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी आगार प्रशासनाला जाग आली. लोकमतने आगाराच्या आवारातील सुरक्षिततेबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर तेथील दक्षतेबाबत उपाययोजना करण्यासंबंधी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली.
शहरातील वल्लभनगर येथील पिंपरी-चिंचवड एसटी आगाराच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. वाढलेल्या झाडा-झुडपांचा आधार घेत एका नराधमाने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास १९ वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर लोकमतने आगाराच्या ठिकाणची परिस्थिती विशद करणारे वृत्त प्रसिद्ध केले. आगाराच्या आवारातील जागोजागीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठीचे पोलीस मदत केंद्र कधी सुरू, तर कधी बंद असते. अनेक नादुरुस्त एसटी बस आगारात पडून आहेत, आगार असुरक्षित बनले आहे.
दरम्यान, स्थानिक पोलिसांच्या पथकाने आगारातील अधिकाऱ्यांसह घटनास्थळाची पाहणी केली. संत तुकारामनगर पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे, आगार व्यवस्थापक अनिल भिसे, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर मलशेट्टी, सहायक वाहतूक निरीक्षक मच्छिंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक रत्नमाला सावंत, रूपाली कुलथे, हवालदार राजेंद्र मारणे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Instant movements for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.