अँब्युलन्सऐवजी वृद्धाला कचरागाडीतून नेले रुग्णालयात, उपचारांदरम्यान झाला मृत्यू

By Admin | Published: January 29, 2016 11:11 AM2016-01-29T11:11:53+5:302016-01-29T11:25:51+5:30

एका वयोवृध्द रुग्णाला रुग्णवाहिकेऐवजी कचरा गाडीतून रुग्णालयात घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार शिर्डीत घडला असून उपचारांदरम्यान त्या वृद्धाचा मृत्यू झाला.

Instead of ambulance the old man was taken from the garbage in the hospital, during treatment he died | अँब्युलन्सऐवजी वृद्धाला कचरागाडीतून नेले रुग्णालयात, उपचारांदरम्यान झाला मृत्यू

अँब्युलन्सऐवजी वृद्धाला कचरागाडीतून नेले रुग्णालयात, उपचारांदरम्यान झाला मृत्यू

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. २९ - एका वयोवृध्द रुग्णाला रुग्णवाहिकेऐवजी कचरा गाडीतून रुग्णालयात घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार साईंच्या शिर्डीत घडला आहे. मात्र त्या वृद्धाचा उपचारांदरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याचे समजते. ते वृद्ध नागरिक मूळचे मुंबईचे रहिवासी होते, अशी माहिती मिळत आहे. 
पिंपळवाडी रोडवर एक वयोवृद्ध व्यक्ती दोन दिवसांपासून पडलेला असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली असता त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सऐवजी चक्क कचरा वाहून नेणा-या गाडीचा वापर केल्याचे समोर आले आहे. साईबाबांच्या दरबारात भक्तगण कोट्यावधींचे दान करत असतात, त्यामुळे साई संस्थानाची भरभराट झाली. तेथे रुग्णांसाठी मोठमोठाली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्सही सुरु झाली. असे असतानाही एका रुग्णाला उपचारांसाठी दाखल करण्यासाठी प्रशासनाला एकही रुग्णवाहिका मिळू नये यावर आश्चर्य व्यक्त होत असून  प्रशासनाच्या या कारभारावर सध्या सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
 

 

Web Title: Instead of ambulance the old man was taken from the garbage in the hospital, during treatment he died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.