हुंड्याची मागणी करणा-या नवरदेवाची मंडपाऐवजी पोलिस स्टेशनमध्ये वरात

By admin | Published: January 31, 2016 02:27 AM2016-01-31T02:27:46+5:302016-01-31T09:12:57+5:30

वाढीव हुंड्याची मागणी करीत नवरीच्या मामाला मारहाण करणाऱ्या नवरदेवासह त्याचे वडील व तीन नातेवाइकांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ऐरोली येथे

Instead of demanding the dowry, instead of the Mandap, | हुंड्याची मागणी करणा-या नवरदेवाची मंडपाऐवजी पोलिस स्टेशनमध्ये वरात

हुंड्याची मागणी करणा-या नवरदेवाची मंडपाऐवजी पोलिस स्टेशनमध्ये वरात

Next

नवी मुंबई : वाढीव हुंड्याची मागणी करीत नवरीच्या मामाला मारहाण करणाऱ्या नवरदेवासह त्याचे वडील व तीन नातेवाइकांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ऐरोली येथे लग्नसमारंभातच हा प्रकार घडला.
ऐरोलीतील प्रजापती हॉलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. कळवा येथे राहणाऱ्या मुलीचा त्या ठिकाणी विवाह सोहळा होणार होता. मात्र विधी पूर्ण होण्यापूर्वीच या लग्नसोहळ्याचे रणभूमीत रूपांतर झाले. वडाळा येथे राहणाऱ्या शैलेश गुप्तासोबत या मुलीचे लग्न होणार होते. लग्नासाठी शैलेशच्या कुटुंबीयांनी दोन लाख रुपयांचा हुंडा घेतला होता, असे मुलीच्या घरच्यांचे म्हणणे आहे. शिवाय लग्नाचा संपूर्ण खर्चदेखील मुलीचे आईवडीलच करणार होते. मात्र लग्नात ऐन वेळी नवऱ्याच्या कुटुंबीयांनी अधिक १ लाख रुपयांची मागणी केली. तसेच ही रक्कम मिळेपर्यंत पुढचा विधी करण्यासही त्यांनी नकार दिला. अखेर रक्कम देण्यास मुलीकडच्यांनी असमर्थता दाखवताच नवरदेवाच्या नातेवाइकांनी मुलीच्या मामाला जबर मारहाण केली. या प्रकारात जखमी झालेले मुलीचे मामा कतवारू गुप्ता यांना कळव्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
हुंड्याची वाढीव रक्कम न दिल्यास मुलीला मारून टाकू, अशी धमकी नवरदेवाच्या घरच्यांनी लग्नातच मुलीच्या नातेवाइकांना दिली. यामुळे मुलीचे अपंग मामा कतवारू हे सामंजस्याने वाद मिटवण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी नवरदेवाचा भाऊ व त्याच्या मित्रांसोबत त्यांचा वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच नवरदेवाच्या भावाने व मित्रांनी लग्नसमारंभासाठी आणलेल्या सामानाची तोडफोड करीत नवरीच्या नातेवाइकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी ते सर्व मद्यधुंद अवस्थेत होत, असे मुलीच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. तर त्यांच्याकडून सामानाची आदळाआपट सुरू असताना खुर्ची लागून मुलाचा एक नातेवाईकदेखील जखमी झाला आहे. वेळीच मुलीच्या नातेवाइकांनी १०० नंबरवर पोलिसांशी संपर्क साधल्याने पुढील गंभीर प्रकार टळला. याप्रकरणी मुलाच्या मामाने हुंडा घेतल्याचे मान्य केले. परंतु वाद हा नाचण्यावरून झाल्याचे सांगितले. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात हुंडा मागणे, हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवरदेव शैलेश गुप्ता, वडील दयानंद गुप्ता व तीन नातेवाइकांना अटक करण्यात आली आहे.
फरार असलेल्यांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी सांगितले.
जखमी झालेले मुलीचे मामा कतवारू गुप्ता यांना कळव्याच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

Web Title: Instead of demanding the dowry, instead of the Mandap,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.