लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 05:08 PM2019-08-12T17:08:46+5:302019-08-12T17:35:43+5:30
महापुरासारख्या संकटात ही लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली.
कोल्हापूर : महापुरासारख्या संकटात ही लोकांचे अश्रू पुसण्यापेक्षा सत्ताधारी मंत्री पक्षाच्या बैठकीत मग्न आहेत अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी येथे केली.
चव्हाण यांनी कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्यानंतर ते बोलत होते.यावेळी आमदार सतेज पाटील उपस्थित होते..श्री चव्हाण म्हणाले, " सत्ताधारी मंत्र्यांनी पूरस्थिती गंभीर असताना वॊटर शो आणि रोड शो केला, हे ते पूरस्थिती कडे गांभीर्याने पाहत नाहीत याचे लक्षण आहे..पूरस्थिती नंतर आता वातावरण चिघळू नये असे कोणतेही वक्तव्य मंत्र्यांनी करू नये असा सल्ला त्यांनी दिला..
(केवळ राज्यासाठी) पूरग्रस्तांना सरकारकडून समाधानकारक मदत नाही
पूरग्रस्तांना प्रतिदिन ६0 रुपये आणि जनावरांना १00 रुपये अशी देऊ घातलेली मदत योग्य नाही. या मदतीमध्ये वाढ करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी सोमवारी कोल्हापूरला भेट देत पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष पी. एन. पाटील आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील होते. चव्हाण यांनी बाजार समितीमधील पूरग्रस्तांच्या छावणीला भेट दिली. तसेच शिवाजी पुलाचीही त्यांनी पाहणी केली.
पूर ओसरताच तातडीने नुकसानीबाबतचे पंचनामे करणे आवश्यक आहे. ते मोठे काम असल्याने त्यासाठी इतर जिल्ह्यांतून आवश्यक असल्यास महसूलचे कर्मचारी आणावे लागतील. आरोग्याचे मोठे काम तातडीने हाती घ्यावे लागेल,’ असेही ते म्हणाले.