युजीसी देणार महाविद्यालयीन परीक्षांबाबत निर्देश; सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 08:14 PM2020-04-14T20:14:44+5:302020-04-14T20:16:07+5:30

विद्यापीठ व महाविद्यालयीन स्थरावरील परीक्षा कोणत्या पध्दतीने व कशा घ्याव्यात यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही

Instructions regarding college exams will be given by UGC | युजीसी देणार महाविद्यालयीन परीक्षांबाबत निर्देश; सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा  

युजीसी देणार महाविद्यालयीन परीक्षांबाबत निर्देश; सोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा  

Next
ठळक मुद्देराज्यपाल नियुक्त समितीही युजीसीच्या नियमावलीच्या प्रतीक्षेत 

 पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.मात्र, या परीक्षांबाबतसोशल मीडियावर उलट-सुलट चर्चा केली जात आहे.परंतु,विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी ) समितीकडून यासंदर्भात अभ्यास केला जात असून या समितीने दिलेल्या अहवालानंतर युजीसीकडून प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार सर्व परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
कोरोनाचा फौलाव रोखण्यासाठी देशातील शाळा, महाविद्यालयांना व विद्यापीठांना सुट्टी देण्यात आली.तसेच राज्यातील पहिली ते  करावी पर्यंतच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, विद्यापीठ व महाविद्यालयीन स्थरावरील परीक्षा कोणत्या पध्दतीने व कशा घ्याव्यात यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.परंतु, विद्यापीठ व महाविद्यालयांच्या परीक्षा कशा घ्याव्यात, याबाबत अहवाल देण्यासाठी 
राज्यपालांच्या सूचनेनुसार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठांच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती समिती स्थापन करण्यात आली आहे.या समितीने ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत अहवाल दिल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे. परंतु,अद्याप या समितीने असा कोणताही अहवाल तयार केलेला नाही. तसेच युजीसीकडून पुढील काळात परीक्षा कशा घ्याव्यात याबाबतचे निर्देश प्राप्त होणार असल्याने या समितीने आपले काम काही कालावधीसाठी थांबवले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. परिणामी महविद्यालयीन परीक्षा विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार किंवा एखाद्या समितीच्या अहवालानुसार होणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे, आवाहन विद्यापीठातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने केले आहे. 
दरम्यान, विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेचा विचार करू नये, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ.अरूण अडसूळ यांनी केले आहे.कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास विद्यापीठाकडे पायाभूत सुविधा उपलब्ध नाही.तसेच ऑनलाईन परीक्षेसाठी आपला अभ्यासक्रम पुरक नाही.एकवेळ राज्यपाल किंवा शासन आदेशानुसार काही तडजोड करून परीक्षा घेणे शक्य आहे.परंतु, ऑनलाईन परीक्षा योग्य नाही, असेही अडसूळ म्हणाले.
---------
राज्यपाल नियुक्त समितीने दिलेला अहवाल आणि युजीसीकडून परीक्षेबाबत प्राप्त होणाऱ्या सूचना यात विरोधाभास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे युजीसीकडून प्राप्त होणानियमावलीनुसारच परीक्षा घेतल्या जाणार आहेत.तसेच पुढील शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू केले पाहिजे,यावरही युजीसी काम करत आहे, असेही सूत्रांनी सांगितले.


 

Web Title: Instructions regarding college exams will be given by UGC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.