मुंबई-गोवा बोट वाहतुकीसाठी आवश्यक ‘त्या’ सूचना

By admin | Published: January 13, 2017 12:01 AM2017-01-13T00:01:35+5:302017-01-13T00:01:35+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक : मेरीटाईम बोर्ड, बंदर विभागाला एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे

'The' instructions required for the Mumbai-Goa boat carriage | मुंबई-गोवा बोट वाहतुकीसाठी आवश्यक ‘त्या’ सूचना

मुंबई-गोवा बोट वाहतुकीसाठी आवश्यक ‘त्या’ सूचना

Next

कोल्हापूर : सौर ऊर्जेच्या वापराद्वारे प्रतिभानगरमधील निवृत्त धातुशास्त्र अभियंता श्रीराम पोतनीस यांनी महिन्याकाठी त्यांना येणारे सुमारे सात हजार रुपयांचे वीज बिल अवघ्या ५० रुपयांवर आणले आहे. सौर ऊर्जेद्वारे तयार झालेल्या विजेच्या वापरासह ती पुन्हा ‘महावितरण’ला देत आहेत.
विजेच्या बिलाच्या बचतीसाठी सौर ऊर्जेचा वापर पोतनीस यांनी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पायोनियर एनर्जीच्या मदतीने तीन किलोवॅटचा सोलर पॉवर जनरेशन नेट मिटरिंगसह असलेला प्रकल्प त्यांनी स्वत:च्या बंगल्यावर कार्यान्वित केला. सोलर इन्व्हर्टर बसविला आहे. त्यात सूर्यप्रकाशापासून रोज विद्युत निर्मिती होते. घरातील विविध विद्युत उपकरणांसाठी वापर करून शिल्लक राहिलेली वीज ते ‘नेट मीटर’द्वारे ‘महावितरण’ला परत देत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून कार्यान्वित असलेल्या संबंधित प्रकल्पाचे गुरुवारी ‘महावितरण’च्या कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता जितेंद्र सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शहर विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील माने, ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रावसाहेब चव्हाण, पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी, आॅटोबॅटचे हनुमंत रेड्डी, के. सोलरचे सुनील सिन्नरकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


शून्य युनिट वापर
वाढणाऱ्या वीज बिलाला पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर करण्याचा निर्णय घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित केला असल्याचे श्रीराम पोतनीस यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रकल्पामुळे आम्ही जितकी वीज वापरली, तितकीच ‘महावितरण’ला परत दिल्यामुळे नोव्हेंबरमधील विजेचा वापर शून्य युनिट झाला आहे. त्यामुळे दरमहा नियमितपणे सुमारे सात हजार रुपयांपर्यंत येणारे वीज बिल नोव्हेंबरमध्ये अवघे ५० रुपये आले आहे. या बिलामध्ये स्थिर आकाराचा समावेश आहे.

किमान २५ वर्षे विजेची बचत
या प्रकल्पामुळे पुढील किमान २५ वर्षे पोतनीस यांना नगण्य वीज बिल येईल. त्यातून विजेची बचत होणार असल्याचे ‘पायोनियर एनर्जी’चे महेश कुलकर्णी यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रकल्पामध्ये ‘महावितरण’चे मीटर, नेट मीटर आणि सोलर मीटर कार्यान्वित केले आहे. त्यातील नेट मीटरद्वारे ‘महावितरण’कडून आलेली वीज, त्यांना पोतनीस यांनी परत केलेली वीज, आदींची अद्ययावत माहिती मिळते. त्यात सोलर इन्व्हर्टर कार्यान्वित केला आहे. त्याद्वारे सौरऊर्जेतून निर्मिती झालेल्या विजेच्या युनिटची माहिती मोबाईल, लॅपटॉपवर संदेशाद्वारे मिळते. यासाठी साडेतीन लाख रुपयांचा खर्च झाला आहे.


कोल्हापुरातील प्रतिभानगरमधील श्रीराम पोतनीस यांच्या निवासस्थानी सोलर पॉवर जनरेशन नेट मीटरिंग प्रकल्प साकारण्यात आला आहे.

Web Title: 'The' instructions required for the Mumbai-Goa boat carriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.