ऊसतोडणी कामगारांना विम्याचे कवच

By admin | Published: October 25, 2015 01:45 AM2015-10-25T01:45:41+5:302015-10-25T01:45:41+5:30

ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीमध्ये लवकरच वाढ केली जाईल, तसेच त्यांना विम्याचे कवच प्रदान केले जाईल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे सांगितले.

Insurance armor for insurance workers | ऊसतोडणी कामगारांना विम्याचे कवच

ऊसतोडणी कामगारांना विम्याचे कवच

Next

मुंबई : ऊसतोडणी कामगारांच्या मजुरीमध्ये लवकरच वाढ केली जाईल, तसेच त्यांना विम्याचे कवच प्रदान केले जाईल, असे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी येथे सांगितले.
ऊसतोडणी कामगारांचे हित लक्षात घेऊन, कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याचा निर्णय लवादाकडून घेण्यात आला आहे. २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीतील पाच हंगामांसाठी याबाबतचा करार ग्राह्य राहील. ऊसतोडणीचे मजूर गंभीर जखमी, तसेच अपघाती मृत्यू झाल्यास त्यासंबंधी सामूहिक अथवा अन्य विमा योजना लागू करण्यासही लवादाने मंजुरी दिली आहे. विमा कंपन्यांशी चर्चा करून सहकार विभाग याबाबतचा प्रस्ताव तयार करेल, असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
ऊसतोडणी मजुरांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी पंकजा मुंडे व माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचा लवाद शासनाने नेमला आहे. लवादाचा निर्णय मुंडे यांनी पत्रपरिषदेत जाहीर केला. यावेळी जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे आदी उपस्थित होते.
लवादाच्या निर्णयानुसार राज्यातील विविध ऊसतोडणी संघटनांनी आपल्या प्रत्येक मुकादम व प्रत्येक ऊसतोडणी कामगारांची नाव, पत्ते व ओळखपत्रे (आधारकार्ड इत्यादी) संबंधित कारखान्याकडे जमा केल्यानंतर संघटनेची वर्गणी व मुकादम कमिशन दिले जाणार आहे.
काही मुकादम व कंत्राटदारांनी कारखान्याकडून ऊसतोडणीसाठी अग्रीम रक्कम उचल घेतली आहे व कामाची पूर्तता केली नाही. त्यामुळे राज्यातील कारखान्यांची अनेक वर्षा$ंपासूनच्या मोठ्या प्रमाणात रक्कम थकीत आहे. या थकीत रकमेच्या वसुली केली जाईल. ही रक्कम वसूल करू न देणे हे संबंधित ऊसतोडणी कामगार व मुकादम संघटना यांना बंधनकारक राहील. (विशेष प्रतिनिधी)

2011 मध्ये पुणे येथे साखर हंगाम २०११-१२ ते २०१३-१४ या तीन हंगामाकरिता करार करण्यात आला होता. त्या करारामध्ये निश्चित झालेल्या रकमेवर हंगाम २०१५-१६ पासून पुढील पाच वर्षांकरिता वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार, डोकी सेंटर, गाडी सेंटर व टायर सेंटर दरामध्ये २० टक्के वाढ करण्यात येत असून, मुकादम, कंत्राटदार कमिशन दर १८.५ टक्के करण्यात येत आहे.

लवादाच्या निर्णयानुसार ऊसतोडणी मजुरांना कारखान्यांच्या गाळप हंगाम संपेपर्यंत कार्यरत राहावे लागेल. ऊसतोडणी व मुकादम कमिशन या मंजूर रकमेव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांकडून घेतल्याची कारखान्यांकडे
तक्र ार आल्यास त्याची शाहनिशा करून ती सत्य असल्याचे आढल्यास, त्या रकमेची कपात केली जाईल.

लवादाचा निर्णय अमान्य
कोल्हापूर : ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात २० टक्के वाढ करीत पाच वर्षांचा करार करण्यास लवादाने मंजुरी दिली आहे. त्याचा ऊसतोडणी व वाहतूक संघटनांनी निषेध केला असून जुजबी दरवाढ करीत, मागील वर्षाचा फरक बुडवून तीनऐवजी पाच वर्षांचा करार करून लवादाने मजुरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याची भावना संघटनेतून उमटत आहे.
शनिवारी दुपारी मुदाळ तिट्टा येथे ‘रास्ता रोको’ करून संघटनेने लवादाच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. लवादाच्या या निर्णयाविरोधात आता आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार आहे. दोन दिवसांत बीड येथे राज्यातील ऊसतोडणी कामगार संघटनांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे.

लवादाने राज्यातील दहा लाख तोडणी व वाहतूकदारांची फसवणूक केल्याने त्याचा निषेध करतो. आम्ही लवादावर विश्वास ठेवला; पण त्यांनी विश्वासघात केला. आगामी काळात आक्रमकपणे आंदोलन करणार आहोत.
- प्रा. डॉ. सुभाष जाधव, सरचिटणीस, ऊसतोडणी
व वाहतूक संघटना

Web Title: Insurance armor for insurance workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.