पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 10:53 PM2018-07-13T22:53:01+5:302018-07-13T22:53:56+5:30

पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची श्रध्दास्थान असणारी चंद्रभागा होणार स्वच्छ, भाविकांचा अंघोळ व स्वच्छतागृहाचाही प्रश्न सोडविण्यासाठी सरकार एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. यासबंधी लक्षवेधी आ.डॉ.नीलम गो-हे यांनी सभागृहामध्ये मांडला.  

Integrated Development Project for the Cleanliness of Chandrabhaga in Pandharpur | पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार

पंढरपुरातील चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार

googlenewsNext

नागपूर : पंढरपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची श्रध्दास्थान असणारी चंद्रभागा होणार स्वच्छ, भाविकांचा अंघोळ व स्वच्छतागृहाचाही प्रश्न सोडविण्यासाठी सरकार एकात्मिक विकास प्रकल्प राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. यासबंधी लक्षवेधी आ.डॉ.नीलम गो-हे यांनी सभागृहामध्ये मांडला.  
दक्षिणेची काशी म्हणून महाराष्ट्रातील पंढरपूर हे ओळखले जाते. वर्षभर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते, आषाढी कार्तिकेला तर पंढरपूरमध्ये भाविकांची अलोट गर्दी उसळते, त्यामुळे पायाभूत सुविधांचा बोजवारा उडतो. चंद्रभागा नदीकडे भाविक एक श्रद्धास्थान म्हणून पाहतात. मात्र अधिक मासाच्या पार्श्वभूमीवर दिनांक १६ मे, २०१८ पासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला व चंद्रभागेमध्ये स्नान करण्याकरता भाविकांची अलोट गर्दी झाली असताना नदीच्या पात्रात मैलामिश्रित पाणी असल्याचे भाविकांना जाणवले होते, दुर्गंधीयुक्त व दूषित पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्यास निर्माण झालेला धोका तसेच तीरावर खड्डे खणले असल्यामुळे त्या खड्यामध्ये अनेक लहान मुले, महिला, पुरुष भाविक दगावण्याची शक्यता आहे. तसेच येथे निर्माल्य कुंड असावे तेही नाही. हे आ.डॉ.नीलम गो-हे  यांच्या लक्ष्यात आल्याने त्यांनी आज सभागृहामध्ये यासबंधी लक्षवेधी मांडला.
यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले की, पंढरपूरमध्ये जेवढे सांडपाणी तयार होते त्यातुलनेत सांडपाण्याचा निचरा करणार प्रकल्प कार्यान्वित नाही. सध्या १५.५० एमएलडी सांडपाण्याचा निचरा करणारी यंत्रणा आहे. मात्र सध्या ८ एमएलडी सांडपाण्याचा निचरा सध्या होतोय.  म्हणून २०४९ पर्यंत या शहराची सांडपाण्याचा निचरा होण्याची गरज लक्ष्यात घेता "एकात्मिक विकास प्रकल्प" राबविण्यात येणार आहे. यात ५९.७५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. यातुन ६६ किलोमीटर ची नवीन अंडरलाईन सांडपाणी नेणारी पाईपलाईन करण्यात येऊन या पाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा उपयोगात आणण्यात येणार आहे. तसेच भीमा व चंद्रभागा नद्यांमध्ये दौंड, शिरूर आणि बारामती ईंदापूर, पुणे, पिंपरी चिंचवड या व इतर शहरातून दूषित पाणी नदीत सोडले जाते आहे या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध योजने अंतर्गत निधी देण्यात आला आहे. तसेच पंढरपूर नगरपालिका आणि पंढरपूर देवस्थान समिती यांनी कचरा व्यवस्थापन करण्यासाठी खाजगी संस्थांच्या माध्यमातून नदी पात्रातील  कचरा उचलण्यासाठी नेमली आहे.

नीलम गो-हे  यांनी उपस्थित केलेले उपप्रश्न...
१) सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ड्रेनेज क्षमता वाढविण्यासाठी लागणाऱ्या ६८ दशलक्ष निधी कधी देणार?
२) चंद्रभागेत वाळू उपशामुळे व पाणी साठविण्यासाठी खड्डे खणले जातात त्यामध्ये अनेक भाविक दगावले आहेत, त्या संबंधी काय उपाययोजना करणार?
३) महिलांना अंघोळीसाठी तयार केलेल्या स्नानगृहे उपलब्ध नाहीत आणि तात्पुरते उभारण्यात आलेले स्नानगृहे उडून गेले आहेत, त्यावर काय उपाययोजन करणार?

Web Title: Integrated Development Project for the Cleanliness of Chandrabhaga in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.