मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नासाठी एकात्मिक योजना- सुरेश प्रभू

By Admin | Published: June 4, 2017 02:25 PM2017-06-04T14:25:06+5:302017-06-04T14:25:06+5:30

मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे दुर्दैवाने निर्माण झालेला कित्येक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काम सुरू

Integrated Scheme for Railway Question in Marathwada - Suresh Prabhu | मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नासाठी एकात्मिक योजना- सुरेश प्रभू

मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नासाठी एकात्मिक योजना- सुरेश प्रभू

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 4 - मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे दुर्दैवाने निर्माण झालेला कित्येक वर्षांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काम सुरू आहे. मराठवाड्यासाठी एकात्मिक योजना तयार करीत आहोत. यातून मराठवाडा रेल्वे मार्गांनी विविध शहरांशी जोडण्यासह प्रलंबबित प्रश्न सुटतील, असे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले.
विविध कार्यक्रमांनिमित्त शनिवारी (दि.३) शहरात दाखल झाल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी खा. रावसाहेब दानवे, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, आ. अतुल सावे, शिरीष बोराळकर आदी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना सुरेश प्रभू म्हणाले की, निसर्गाची अवकृपा झाल्यानंतर शेतकऱ्यांवर आपत्ती कोसळते. ही आपत्ती टाळण्यासाठी देशात प्रथमच विमा योजना तयार करण्यात आली. पुढच्या पाच वर्षांत म्हणजे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, यादृष्टीने विविध स्वरूपांतील कामांना सुरुवात झाली आहे. शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा, चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी काम करण्यात येत असल्याचे सांगत प्रभूंनी शेतकऱ्यांच्या संपामुळे राज्यात निर्माण झालेली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे यांच्यातर्फे संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्यातून अनेक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटीच्या वतीने सोलापूर-धुळे या राष्ट्रीय मार्गाचे ककाम हाती घेण्यात आले आहे. यासाठी कन्नड घाटात बोगदा तयार करण्यात येत आहे. याच बोगद्यातून दौलताबाद-चाळीसगाव रेल्वेमार्ग नेण्याची मागणी होत आहे. जमिनीचा प्रश्न सुटणार असल्याने याचा विचार करण्यात येईल. देशातील नदी जोडण्याचे काम महत्त्वाचे आहे, असे सुरेश प्रभू म्हणाले.

३ लाख ७५ हजार कोटींची गुंतवणूक

रेल्वेच्या क्षेत्रात तीन वर्षांत ३ लाख ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक क रण्यात आली आहे. अर्थसंकल्पाच्या बाहेर जाऊन ही गुंतवणूक होत आहे. प्रत्येक दिवशी रेल्वे रूळ निर्माण करण्यात अडीच पट वाढ झाली आहे. आगामी दहा वर्षांत ४१ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या विजेची बचत केली जाणार आहे. उद्याची गरज लक्षात घेऊन आजच गुंतवणूक करीत असल्याचे सुरेश प्रभू म्हणाले.

 दमरेची पॅचवर्क सारखी स्थिती
गेल्या अनेक वर्षांपासून दक्षिण मध्य रेल्वेतील नांदेड विभाग मध्य रेल्वेशी जोडण्याची मागणी होत आहे. पूर्वी तीन ते चार विभाग होते; परंतु नंतर वाढत गेले. परिणामी, पॅचवर्कसारखी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी योग्य आहे. याचा परिणाम संपूर्ण देशातील झोनवर होईल. त्यामुळे हे क से करता येईल, यासंदर्भात काम सुरू असल्याचे प्रभू म्हणाले.

Web Title: Integrated Scheme for Railway Question in Marathwada - Suresh Prabhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.