जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरणार
By admin | Published: August 10, 2014 02:35 AM2014-08-10T02:35:27+5:302014-08-10T02:35:27+5:30
‘जिंकण्याच्या इराद्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सत्ता मिळवूनच दाखवू, असा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
Next
>श्रीनारायण तिवारी - मुंबई
आघाडी सरकारने राज्यात केलेली विकासकामे लक्षात घेता आगामी निवडणुकीत जनता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारलाच पसंती देईल, असा विश्वास व्यक्त करतानाच ‘जिंकण्याच्या इराद्यानेच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून सत्ता मिळवूनच दाखवू, असा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
‘लोकमत’शी बातचीत करताना मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या पाच वर्षाच्या कामांचा लेखाजोखा मांडला. लोकसभा निवडणुकीदरम्यान खोटय़ा आश्वासनांचा आणि खोटय़ा दाव्यांचा डोंगर उभारला गेला. काही काळासाठी जनता या दाव्याला भुलली.
ही फसवणूक आता जनतेच्या लक्षात आली आहे. त्यामुळे मोदींची लाट पुरती ओसरली आहे. जनता आता महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याची सूत्रे जातीयवादी शक्तींच्या हाती देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
1995 साली जनतेने युतीकडे सत्ता सोपविली होती. त्याचे परिणामही जनतेने पाहिले. पुन्हा एकदा 95ची पुनरावृत्ती जनता करणार नाही. ‘अँटी इन्कम्बसी’बाबत जी
चर्चा चालू आह़ेत्यात काही तथ्य नाही. राज्यात सतत तीनवेळा आणि केंद्रात दोनवेळा आघाडीचे सरकार बनले. यावेळी मोदींच्या खोटय़ा दाव्यांमुळे आणि प्रचारामुळे आघाडी सरकारचा पराभव झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
धनगर आरक्षणाची मागणी न्याय्य असल्याचे मान्य करतानाच यातील कायदेशीर अडचणी दूर करण्याचे काम सुरु आहे. मराठा आणि मुस्लिम आरक्षणाबद्दल आज अनेक होर्डिग्ज् लागल्याचे दिसतायत. पण, हा निर्णय माङया सरकारने घेतला. त्यासाठी राणो समितीची स्थापना करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत मनसेने पत्करलेल्या शरणागतीमुळे त्यांचे अस्तित्व संपणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मनसेने आगामी विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतली नाहीतर त्याचा मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता त्यांनी वर्तविली. (प्रतिनिधी)
बंड इतिहासजमा
उद्योगमंत्री नारायण राणो यांच्या बंडाचा विषय आता इतिहास जमा झाला आहे. निवडणुका माङयाच नेतृत्त्वाखाली लढविल्या जातील. प्रचार प्रमुखाची महत्त्वाची जबाबदारी राणोंकडे सोपविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भक्कम
च्काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी भक्कम आहे. दोन्ही पक्ष आगामी निवडणूक एकत्र लढतील आणि धर्माध शक्तींना रोखतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
च्जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आपण तत्परता दाखविली. बिल्डरधार्जिण्या निर्णयांकडे कानाडोळा केल्यामुळेच आपल्यावर संथ कारभाराचा आरोप करण्यात आला.
च्मेट्रो, मोनो रेल, पूर्व मुक्तवाहिनी, सांताक्रूझ लिंक रोड, 17 उड्डाणपूल,
मिहान, गोसीखुर्द अशी अनेक विकासकामे झाली. जनता त्याची नक्कीच दखल घेईल.