सहकारमंत्र्यांनी रेल्वेत साधला नागरिकांशी संवाद
By admin | Published: September 2, 2016 10:57 AM2016-09-02T10:57:42+5:302016-09-02T10:57:42+5:30
सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी सोलापूर पुणे रेल्वे प्रवास करून प्रवाशांसी संवाद साधून सोलापूरच्या समस्या जाणून घेतल्या.
Next
>राजकुमार सारोळे
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २ - सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी सोलापूर पुणे रेल्वे प्रवास करून प्रवाशांसी संवाद साधून सोलापूरच्या समस्या जाणून घेतल्या.
सोलापूर—पुणे इंटरसिटी ही दररोज सकाळी साडेसहा वाजता सोलापुरातून निघते. या गाडीतून दररोज सुमारे दोन हजार तरुण पुण्याला नोकरी व इतर कामासाठी प्रवास करतात. त्यामुळे ही गाडी म्हणजे सोलापूरच्या तरुणांची लाईफलाईन बनली आहे. शुक्रवारी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी या गाडीने प्रवास करून रेल्वे व सोलापूर शहराविषयीच्या समस्या जाणून घेतल्या. गाडीतील वातानुकुलीत डबा सोडून ते प्रवाशांत मिसळले. त्यांनी प्रत्येक डब्यात जाऊन तरुण व इतर प्रवाशांशी संवाद साधला. सोलापुरात काय हवे व पुण्याला कशासाठी निघालात असे दोन प्रश्न त्यांनी प्रत्येकांना विचारले. यातील बहुतांश तरुणांनी शिक्षण, नोकरी असेच उत्तर दिले. सोलापुरात मोठे उद्योग नाही, विशेषत: आभियांत्रिकी, आयटी क्षेत्रात संधी नाहीत. त्यामुळे शिक्षण घेऊनही हाताला काम मिळत नाही, त्यासाठी अनेकांना पुण्याला जावे लागते. सोलापुरात या संधी कशा उपलब्ध करता येतील याबाबत त्यांनी अनेकांची मते जाणून घेतली. रेल्वे प्रवाशांच्या समस्याबाबत त्यांनी माहिती विचारली. सहकार मंत्री देशमुख थेट समोर पाहून अनेकांना आचंबा वाटला व अनेकांनी त्यांच्याबरोबर सेल्फी घेतली.