292 रहिवाशांना 10 कोटींची व्याजमाफी

By admin | Published: August 8, 2014 01:23 AM2014-08-08T01:23:53+5:302014-08-08T01:23:53+5:30

सायनमधील म्हाडाच्या इमारतीमध्ये राहत असलेल्या 292 थकबाकीदार रहिवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

Interest of 10 crores to 292 residents | 292 रहिवाशांना 10 कोटींची व्याजमाफी

292 रहिवाशांना 10 कोटींची व्याजमाफी

Next
>मुंबई : सायनमधील म्हाडाच्या इमारतीमध्ये राहत असलेल्या 292 थकबाकीदार रहिवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण मुद्दलासह व्याजातील 4क् टक्के रक्कम 3 महिन्यांच्या आत भरल्यास त्यांची जवळपास 1क् कोटींची व्याजमाफी मिळणार आहे. प्राधिकरणाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये अभय योजनेंतर्गत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले.  
म्हाडाने 2क्क्1 साली सायन-प्रतीक्षानगर येथे अत्यल्प उत्पन्न गटासाठी घरे बांधली होती. त्यापैकी 292 रहिवाशांनी अद्याप घरांची मूळ किंमत अदा केली नसून त्यांच्याकडे अद्याप 6 कोटींची थकबाकी असून त्यावरील व्याजाचा आकडा 19 कोटींवर पोहोचला आहे. त्यांच्याकडून वसुली होत नसल्याने म्हाडाने अन्य शासकीय विभागाप्रमाणो एकरकमी रक्कम भरणा:यांना अभय योजनेंतर्गत व्याजमाफी करण्याचा निर्णय गेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार मुंबई मंडळाने सायनधील थकबाकीदारांना व्याजमाफी करण्याबाबतचा प्रस्ताव आज झालेल्या बैठकीमध्ये मांडला होता. 
292 थकबाकीदारांची एकूण रक्कम 25 कोटींवर असून त्यात 
व्याज 19 कोटी आहे. थकबाकी माफीच्या धोरणानुसार रहिवाशांनी आपली पूर्ण बाकी 3 महिन्यांमध्ये 
जमा केल्यास त्यांच्यावर मुद्दलावर अकारले जाणारे 6क् टक्के व्याज 
माफ केले जाईल. अन्यथा त्यांनी थकबाकी न भरल्यास नियमाप्रमाणो वसुलीची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे सूत्रंकडून सांगण्यात 
आले. या महत्त्वपूर्ण निर्णयाबरोबरच  मागील बैठकीत घेण्यात 
आलेल्या निर्णय कायम करण्यात आले. समतानगरातील बुद्धमंदिर, घराच्या लॉटरीतील सुधारणा, हस्तांतरणातील शुल्क वाढीबाबतच्या प्रस्तावावरील पुढील बैठकीमध्ये 
चर्चा करण्यात येणार 
असल्याचे अधिका:यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
 
महिन्यात 3 बैठकींचा विक्रम?
च्म्हाडाच्या विविध मंडळांकडून गृहयोजना व त्याअनुषंगाने राबविण्यात येणा:या विविध निर्णयांना प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम स्वरूप प्राप्त होते. प्राधिकरणाची दोन महिन्यांमध्ये किमान एकवेळा बैठक घ्यावी, अशी तरतूद असताना कधी म्हाडाचे उपाध्यक्ष तर कधी गृहनिर्माण व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गैरहजर राहिल्याने गेल्या वर्षी मात्र तब्बल 6 महिने बैठक झाली नव्हती. याउलट सध्याची परिस्थिती आहे. 
 
च्22 जुलैला प्राधिकरणाची बैठक झाल्यानंतर आज व पुढची बैठक 21 ऑगस्टला घेण्याचा निर्णय झाला. 25 ऑगस्टनंतर विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
 
च्त्यामुळे एका महिन्यामध्ये तब्बल 3 बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. 21 ऑगस्टला बैठक झाल्यास अल्प अंतरामधील बैठकीचा विक्रम ठरेल, असे सूत्रंकडून सांगण्यात आले.  

Web Title: Interest of 10 crores to 292 residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.