झेडपी शिक्षकांच्या बदल्यांतील हस्तक्षेपाला आता लागणार ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 09:31 AM2021-06-01T09:31:02+5:302021-06-01T09:31:13+5:30

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. त्यात सचिव तथा राज्य समन्वयक म्हणून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नेमणूक केली आहे.

Interference in ZP teacher transfers will now take a break | झेडपी शिक्षकांच्या बदल्यांतील हस्तक्षेपाला आता लागणार ब्रेक

झेडपी शिक्षकांच्या बदल्यांतील हस्तक्षेपाला आता लागणार ब्रेक

Next

अमरावती : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत ऑनलाइन बदल्यांसाठी नव्याने सॉफ्टवेअर विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांमध्ये होणारा मानवी हस्तक्षेप थांबणार असून, नियमानुसार शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. त्यात सचिव तथा राज्य समन्वयक म्हणून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नेमणूक केली आहे. ही समिती पाच जणांची असून, अध्यक्ष आणि सचिव यांच्यासह चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार आणि वर्धा जिल्हा परिषदेचे सचिन ओंबासे हे तीन सदस्य असणार आहेत.

शिक्षकांचे आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेसाठी निविदा प्रक्रिया राबविणे, त्यासाठी सातारा जिल्हा परिषद, महाआयटी, एनआयसी, सी-डॅक या संस्थांची मदत घ्यावी लागणार आहे. सॉफ्टवेअर विकसित केल्यानंतर त्याची चाचणी करून प्रत्यक्षात वापर करावा, असा सूचना देण्यात आल्या आहेत. सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी महिनाभराची मुदत देण्यात आली आहे.

सॉफ्टवेअरमध्ये पारदर्शकता व सुरक्षिततेवर भर
शिक्षक बदलीमध्ये पारदर्शकता असावी आणि सुरक्षितता या दोन महत्त्वाच्या गोष्टीकडे सॉफ्टवेअर तयार करताना लक्ष दिले जाणार आहे. त्यासाठी शॉर्ट टेंडर काढण्यात येणार असून, सर्व बाबींचा विचार करून ही समिती सदर सॉफ्टवेअर विकसित करेल. त्यानंतर तात्काळ शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात होईल, असे समितीचे अध्यक्ष तथा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Web Title: Interference in ZP teacher transfers will now take a break

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.