२६ नोव्हेंबरपर्यंत ‘त्या’ चौघांना अंतरिम दिलासा
By admin | Published: November 24, 2015 02:49 AM2015-11-24T02:49:03+5:302015-11-24T02:49:03+5:30
परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेले ठाण्याच्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे.
मुंबई : परमार यांच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचा आरोप असलेले ठाण्याच्या चार नगरसेवकांना उच्च न्यायालयाने २६ नोव्हेंबरपर्यंत दिलासा दिला आहे. या दरम्यान चौघांनाही राज्य सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सोमावारी दिले.
ठाण्याचे बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल ठाण्याचे काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. अटक होईल,
या भीतीने काही दिवस हे चौघेही भूमिगत होते. ठाणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने या चौघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली.
उच्च न्यायालयाच्या दिवाळी सुटीकालीन खंडपीठाने ३ नोव्हेंबरला चौघांनाही अंतरिम दिलासा देत सरकारला जामीन अर्जावर उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विशेष सरकारी वकील राजा
ठाकरे यांनी सोमवारी न्या. गडकरी यांच्यापुढे सरकारचे उत्तर दाखल
केले. या चौघांवरील गुन्हाची
पोलीस चौकशी करणे आवश्यक आहे. ते पोलिसांना तपासकार्यात मदत करत नसल्याचे सरकारने
म्हटले आहे. त्यावर न्या. गडकरी यांनी राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडण्याचे निर्देश देत २६ नोव्हेंबरपर्यंत या चौघांनाही अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. (प्रतिनिधी)