खडसे-महाजन यांच्यातील अंतर्गत वाद भाजपाला संपवेल: दिलीप वळसे- पाटील

By admin | Published: June 16, 2016 04:37 PM2016-06-16T16:37:14+5:302016-06-16T16:37:29+5:30

सध्या सत्तेत असलेले भाजपा व शिवसेना हे परस्परांना निजाम व रझाकाराची उपाधी देत आहेत, अशी टीका दिलीप-वळसे पाटील यांनी केली

The internal dispute between Khadse-Mahajan and BJP will end: Dilip Walse-Patil | खडसे-महाजन यांच्यातील अंतर्गत वाद भाजपाला संपवेल: दिलीप वळसे- पाटील

खडसे-महाजन यांच्यातील अंतर्गत वाद भाजपाला संपवेल: दिलीप वळसे- पाटील

Next

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि. १६ -  सध्या सत्तेत असलेले भाजपा व शिवसेना हे परस्परांना निजाम आणि रझाकाराची उपाधी देत असून जळगाव जिल्ह्यात तर माजी मंत्री एकनाथराव खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात वाद सुरु आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ सरकारविरोधात असंतोष निर्माण करून जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे प्रभारी व माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दुपारी झालेल्या या मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांना वेळ नाही
महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा भाग असलेला मराठवाडा दुष्काळामुळे होरपळत आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी मराठवाड्यात जाणून शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात ४० प्रचारसभा घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेण्यास महाराष्ट्रात येण्यासाठी वेळ नाही. सुरुवातीला बाबरी मशिद आणि राममंदिर उभारणीचा मुद्दा भाजपातर्फे उपस्थित करण्यात आला होता. आता हिंदू- मुस्लीम वाद उभा करीत मुस्लिम मुक्त राष्ट्राच्या घोषणा भाजपाच्या काही नेत्यांकडून सुरु आहे. पंतप्रधान किंवा भाजपाचे वरिष्ठ नेते मात्र याबाबत मौन धारण करून आहेत.

Web Title: The internal dispute between Khadse-Mahajan and BJP will end: Dilip Walse-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.