जळगावात आजपासून आंतरराष्ट्रीय महिला परिषद
By admin | Published: October 2, 2016 01:09 AM2016-10-02T01:09:00+5:302016-10-02T01:09:00+5:30
सहिष्णुता व अहिंसेच्या विचार व वर्तनाला भक्कम करण्याच्या उद्देशाने जैन हिल्स येथील गांधीतीर्थ येथे २ आॅक्टोबरपासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषद होत
जळगाव : सहिष्णुता व अहिंसेच्या विचार व वर्तनाला भक्कम करण्याच्या उद्देशाने जैन हिल्स येथील गांधीतीर्थ येथे २ आॅक्टोबरपासून तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषद होत आहे. गांधी रिसर्च फाउंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्युट आॅफ नॉन व्हायलन्स अॅण्ड पीस, मदुराई यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या परिषदेत ३५ देशांतील सुमारे २०० महिला प्रतिनिधी सहभागी होतील.
रविवारी सकाळी १०.३० वाजता जैन हिल्स येथील आकाश ग्राऊंडवर कृष्णमल जगन्नाथन यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या जिल कार-हॅरिस, विश्वस्त दलिचंद जैन, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)