International Yoga Day 2018 : निसर्गाची आरोग्याशी नाळ जोडणारा डॉक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:50 AM2018-06-21T02:50:24+5:302018-06-21T02:50:24+5:30
कोणतेही औषध, मशिन न वापरता कमीतकमी दिवसात आजारावर उपचार करणारे डॉक्टर नारायण राव याकरिता प्रसिद्ध आहेत.
मुंबई : कोणतेही औषध, मशिन न वापरता कमीतकमी दिवसात आजारावर उपचार करणारे डॉक्टर नारायण राव याकरिता प्रसिद्ध आहेत. यासाठी मार्केटिंग नाही, कोणतेही फंडे ते वापरत नाहीत. रोगांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊच नये, असा विचार सर्वांनी पाळला पाहिजे. साधे खा, निसर्गाशी एकरूप होऊन रहा आणि भरपूर पाणी प्या, असा सल्ला डॉक्टर नारायण राव यांचे म्हणणे आहे.
समृद्ध कोकणचे मुख्य आयोजक संजय यादवराव यांनी सांगितले, डॉ. राव यांच्या उपचारामुळे शरीर हलके, दैनंदिन जीवनात कामाची गती वाढली. पोट आणि शरीर सर्व बाजूंनी कमी व्हायला सुरुवात झाली आणि १० वर्षांनी वय कमी झाल्याचा आत्मविश्वास आला. बहुतांश दवाखाने, हॉस्पिटलमधून आजारांची मोठ-मोठी नावे घेऊन रुग्णांना घाबरविण्यात येते. त्यावर डॉक्टरांकडून आधुनिक उपचार पद्धती करून जास्त पैसे उकळण्यात येतात. मात्र, नारायण राव यांच्याकडून भारतीय जीवन पद्धती, नेहमी ताजे अन्न, दिवसातून केवळ ३ वेळा भोजन, सूर्यास्तापूर्वी रात्रीचे जेवण, योगासन अशा अतिशय सोप्या पद्धतीने उपचार केला जाते.
कोणत्याही औषधाचा किंवा मशिनविना संपूर्ण पोट आणि शरीर आतून साफ करणे, गरजेपेक्षा जास्त खाणे, चमचमीत पदार्थ यावर कशाप्रकारे मात करता येऊ शकते, याबाबत नारायणराव नेहमी प्रबोधन करत असतात. नारायणराव माझ्या आयुष्यात आले व संपूर्ण आरोग्यदायी जीवनाचा मूलमंत्र मिळाला असल्याचे यादवराव यांनी सांगितले.