International Yoga Day 2018 :‘कसरतीला’ जास्त पसंती, परंपरागत योगात कालानुरूप होताहेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:01 AM2018-06-21T02:01:12+5:302018-06-21T02:01:12+5:30

बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, स्पर्धात्मक काळात जगताना सातत्याने कराव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे सहजपणे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

International Yoga Day 2018: 'Gastronomer' is the preferred choice, the change in times of conventional yoga | International Yoga Day 2018 :‘कसरतीला’ जास्त पसंती, परंपरागत योगात कालानुरूप होताहेत बदल

International Yoga Day 2018 :‘कसरतीला’ जास्त पसंती, परंपरागत योगात कालानुरूप होताहेत बदल

Next

- युगंधर ताजणे
पुणे : बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, स्पर्धात्मक काळात जगताना सातत्याने कराव्या लागणाऱ्या आव्हानांचा सामना यामुळे स्वत:च्या आरोग्याकडे सहजपणे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. जगाला योगाची अनमोल देणगी देणाºया भारत देशात आता झटपट परिणांसाठी ‘जिम’कडे तरुणाईचा कल वाढू लागल्याचे दिसून येत आहे. या सगळ्यात आपल्या देशातील योगाचे महत्त्व परदेशी देशांनी जाणून त्यांच्याकडे ‘योगा’ची दखल गांभीर्याने घेत असल्याचे योगाक्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
परंपरागत योगामध्ये आता परिस्थितीनुरूप बदल होत असून, आता पावर योगा, पिलँटिस योगा, असे प्रकार पुरुष व महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहेत. सिनेमांतील अभिनेत्यांच्या सिक्स पॅकची तरुणांना पडलेली भुरळ, तसेच अभिनेत्रींच्या झिरो फिगरची क्रेझ तरुणींच्या डोक्यात घट्ट बसल्याने त्यांना योगाऐवजी जिम जास्त प्रभावी वाटते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जिममधून मिळणारा तत्काळ परिणाम जो योगांमधून तुलनेने उशिरा मिळतो, असे मत तरुणाईचे आहे. याविषयी योगा प्रशिक्षक सलमा हेब्बल यांना विचारले असता त्यांनी तरुणाईच्या बदलत्या फिटनेस आवडीविषयी सांगितले. ज्या वेळी आमच्याकडे तरुण फिटनेस टेÑनिंगसाठी येतात, तेव्हा आम्ही सुरुवातीच्या दिवसांत त्यांना योगाचे काही धडे देतो. यात श्वासावर नियंत्रण, सूर्यनमस्कार यावर भर दिला जातो. मात्र तरुणाईच्या ते पचनी पडत नाही. थोड्याच दिवसांत ते त्याला कंटाळतात आणि जिमकडे लक्ष केंद्रित करतात. काही करून आकर्षक शरीरयष्टी त्यांना कमावयाची असल्याने ते मेहनतीच्या कसरतीला तयार होतात. हल्ली कसरतीच्या जोडीला झुंबा, बॉलिवूड, एरोबिक्स यांचेही प्रमाण वाढल्याचे पाहावयास मिळते. योगातून मिळणाºया रिझल्टकरिता लागणारा संयम तरुण पिढीकडे नसल्याने त्यांची आवड जिमकडे जास्त आहे. योगामुळे एकाग्रता वाढते, श्वासावर नियंत्रण ठेवता येते. विविध आसनांमुळे शरीरांमध्ये एक प्रकारची लवचिकता येते. मन आनंदी, प्रसन्न राहण्यास मदत होते. मात्र या सगळ्यासाठी कमालीचे सातत्य व संयम असणे आवश्यक आहे. जो तरुणांमध्ये फार कमी प्रमाणात आहे.
योगामध्ये तरुणाईची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना आपल्याकडील प्रसिद्ध अय्यंगार योगा, विक्रम हॉट योगा, सद्यस्थितीला लोकप्रिय असलेले पावर योगा, पिलाटिस योगाचे धडे दिले जातात. ज्यात त्यांना सोपी आसने, त्याचे फायदे समजावून सांगितले जातात. तसेच त्या आसनामुळे आरोग्यावर होणारा सकारात्मक परिणामदेखील सांगितला जातो. कमीत कमी वेळेतील आसने, त्याने शरीराला येणारी लवचिकता, मनाचा प्रफुल्लितपणा वाढण्यास मदत होते. सभोवतालच्या प्रदूषित वातावरणामुळे हदयाला स्वच्छ हवा मिळणे अवघड झाले आहे. याची परिणिती अस्थमा, श्वसनाचे विविध आजार, याशिवाय मणक्याचे आजारात होते. इन्स्टंट इफेक्टच्या सध्याच्या जमान्यात योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून, तरुणांंबरोबरच ज्येष्ठांकडून देखील कमी प्रमाणात योग प्रशिक्षणाला प्रतिसाद मिळत आहे.
>तरु णींना हवे एरोबिक्स, झुंबा
१५ ते २0 वयोगटातील मुली, याबरोबरच २५ ते ३५ च्या वयोगटातील तरुणी आणि महिलांना योगापेक्षा एरोबिक्स आणि झुंबासारख्या नृत्यप्रकारात जास्त रस आहे. त्यांना काही करून सुडौल दिसायचे आहे. झिरो फिगरचे आकर्षण आहे. इन्स्टंट रिझल्ट हवा आहे म्हणून ते योगाऐवजी शारीरिक कसरतीला प्राधान्य देतात. मात्र हे सगळे करत असताना सातत्याने डायट, त्याच्या वेळा, वेगवेगळी पथ्ये, याचे काटेकोरपणे पालन करावे लागते. योगा करताना आहाराचे कुठलेही बंधन नाही. त्यात सातत्याची गरज हवी असते. हीच गोष्ट महिलावर्गाच्या लक्षात येत नाही. फिटनेस जिममध्ये कसरत करणाºया महिला या प्रामुख्याने या नोकरदार गटातील असून वेळेची उपलब्धता त्यांच्याकडील मुख्य प्रश्न असल्याचे सलमा सांगतात.
>दुबईमध्ये
योगाची क्रेझ
ज्या देशात योगशास्त्राचा जन्म झाला, त्याच देशात त्याबद्दल विविध विचारप्रवाह प्रचलित आहेत. पाश्चिमात्य देशात योगाचे प्रशिक्षण घेण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आपल्याकडे वेळेचे कारण सांगून योगाकडे दुर्लक्ष केले जाते. तर परदेशात मोठ्या प्रमाणात योगाचे प्रशिक्षणवर्ग सुरू होत आहे. यात दुबई शहराचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. सकाळी-संध्याकाळी योगाच्या अ‍ॅडव्हान्स क्लासेसला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: International Yoga Day 2018: 'Gastronomer' is the preferred choice, the change in times of conventional yoga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग