चार वर्षात चौपटीने वाढणार इंटरनेट ट्रॅफिक
By admin | Published: June 15, 2016 02:49 PM2016-06-15T14:49:21+5:302016-06-15T16:45:04+5:30
‘डिजीटल इंडिया’ आणि ४ जी चा वाढता विस्तार पाहता भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेटचा बाजार वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार २०२० पर्यंत भारतात इंटरनेट ट्रॅफिक चौपटीने वाढणार आहे
अरविंद राठोड
मुंबई : ‘डिजीटल इंडिया’ आणि ४ जी चा वाढता विस्तार पाहता भारतातील स्मार्टफोन आणि इंटरनेटचा बाजार वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार २०२० पर्यंत भारतात इंटरनेट ट्रॅफिक चौपटीने वाढणार आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘सिस्को’ने हा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यांच्या ११ व्या ‘सिस्को व्हिज्युएल नेटवर्किंग इंडेक्स’अनुसार २०२० पर्यंत भारतातील इंटरनेट ट्रॅफिक २०१५ च्या तुलनेत दर वर्षी ३४ टक्क्यांची वृध्दी करत असून, चौपटीने वाढत आहे.
एका सर्वेक्षणानुसार, आगामी पाच वर्षात भारतात १.९ अब्ज इंटरनेटयुक्त उपकरणे असतील, जे २०१५ च्या तुलनेत १.३ अब्जांनी अधिक आहे. त्याच तुलनेत इंटरनेटची गती ५.१ एमबीपीएस वरून २०२० पर्यंत १२.९ एमबीपीएसपर्यंत पोहचू शकेल. या सर्व बाबी लक्षात घेता भारतातील ट्रॅफिक चौपटीने वाढणार हे निश्चित.