इंटरपोलला चकवत ५ वर्षांपासून पुण्यात
By admin | Published: August 29, 2014 03:16 AM2014-08-29T03:16:42+5:302014-08-29T03:16:42+5:30
स्पेनच्या न्यायालयामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पासपोर्ट जप्त झालेली महिला चक्क स्वत:च्या मुलीच्या पासपोर्टवर भारतात पळून आली आहे
दीपक जाधव/संजय कैकाडे, पुणे
स्पेनच्या न्यायालयामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पासपोर्ट जप्त झालेली महिला चक्क स्वत:च्या मुलीच्या पासपोर्टवर भारतात पळून आली आहे. इंटरपोलने रेडकॉर्नर नोटीस जारी केलेली ही महिला चक्क ५ वर्षांपासून पुण्यात वास्तव्य करीत असल्याची माहिती उजेडात आली आहे.
मुळची पुण्याची असलेली ही महिला स्पेनहून तिच्या मुलीच्या पासपोर्टवर भारतात परत आल्याची माहिती ‘लोकमत’ व ‘लोकमत समाचार’च्या प्रतिनिधींना मिळाली होती. तिचा माग काढत केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये हा प्रकरणाचे बिंग फुटले. किरण ब्लास गुत्तीयारीस (४७, रा. ४०२, चेतना अर्पाटमेंट, ईस्ट स्ट्रिट, कॅम्प, पुणे) असे या महिलेचे नाव आहे.
किरणचे कुटुंबीय मुळचे पुण्याचे. व्यवसायाच्या निमित्ताने तिचे वडील शाम इदनानी स्पेनमध्ये स्थायिक झाले. स्पेनमधीन ब्लास गुत्तीयारीस यांच्याशी तिने विवाह केला. तिला ४ मुली आहेत. तिच्या काकाने आर्थिक फसवणूक प्रकरणी तिच्याविरूध्द स्पेनच्या न्यायालयात खटला दाखल केला. त्यानंतर तिचा पासपोर्ट (क्रमांक ई- ६२५५५१९) स्पेनच्या न्यायालयाने डिसेंबर २००९ मध्ये जप्त झाला होता. संबंधित प्रकरणात शिक्षा होईल, या भीतीने तिने भारतात पळण्याची योजना आखली. त्यानुसार किरण जानेवारी २०१० मध्ये चक्क स्वत:च्या मुलीच्या पासपोर्टवर बिनबोभाट भारतात आली.