उमेदवारांची धाकधूक वाढली

By admin | Published: October 19, 2014 12:53 AM2014-10-19T00:53:56+5:302014-10-19T00:53:56+5:30

आघाडीत झालेल्या बिघाडीसह महायुतीत पडलेल्या फुटीत राज्यात आणि मुंबईत पंचरंगी विधानसभा निवडणुका रंगल्या.

The intimidation of the candidates increased | उमेदवारांची धाकधूक वाढली

उमेदवारांची धाकधूक वाढली

Next
सचिन लुंगसे - मुंबई
आघाडीत झालेल्या बिघाडीसह महायुतीत पडलेल्या फुटीत राज्यात आणि मुंबईत पंचरंगी विधानसभा निवडणुका रंगल्या. आज (रविवारी) या पंचरंगी निवडणुकीचा काय निकाल लागतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनपेक्षित धक्कादायक निकाल असेल की एक्ङिाट पोलमधील अंदाज चुकवणारा निकाल लागणार याची उत्सुकताही ताणली गेली आहे. जनमत चाचण्यांमुळे राजकीय चाणक्यांसह सर्वसामान्य नागरिक आणि तळागाळातील कार्यकत्र्यानाही आता निकालाचे वेध लागले आहेत.
मुंबई आणि उपनगरातील 36 विधानसभा मतदारसंघांचे निकाल रविवारी लागणार असून, दुपारी 2 वाजेर्पयत कोणत्या उमेदवाराला किती मते मिळाली? याचे चित्र पूर्णत: स्पष्ट होणार आहे. मुंबईतून विधानसभा निवडणुकीला एकूण 529 उमेदवार रिंगणात असून, यामध्ये सचिन अहिर, वर्षा गायकवाड, नसीम खान आणि सुरेश शेट्टी अशा चार माजी मंत्र्यांचा समावेश आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 36 विधानसभा म्हणजेच राज्यातील सर्वाधिक जागा मुंबईत आहेत. शिवाय मुंबई हे व्यापाराचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जात असल्याने सर्वाचेच लक्ष मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांच्या निकालाकडे लागून राहिले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वाधिक जागा मिळविणा:या भाजपाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीदरम्यान चालविलेल्या टॅगलाइन त्यांच्यावरच उलटल्या. आणि मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला. पण आता राज्यात नवे सरकार कोणाचे येणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद कोणाला मिळणार, याचा फैसलादेखील निकालांबरोबर होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना आणि मनसे हे राज्यातील पाचही प्रमुख पक्ष स्वबळावर लढत असतानाच पंतप्रधानांनी मैदानात उडी घेतल्याने मोदी विरुद्ध अन्य सर्व पक्ष असाच सामना प्रचारादरम्यान रंगला. शिवाय मुंबईसारख्या महानगरात मराठी विरुद्ध गुजराती असाही प्रचाराला रंग दिला गेला. विशेषत: शिवसेना विरुद्ध भाजपा अशीच लढाई रंगल्याने मतदारांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. 
अंदाज चूक की बरोबर?
विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सर्वच वृत्तवाहिन्यांसह अन्य संस्थांनीदेखील जनमत चाचण्या घेतल्या. त्या जनमत चाचण्यांनी भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज बांधला आहे. यावर भाजपाच्या गोटात आनंद निर्माण झाला असून, आता मुख्यमंत्री कोण होणार? याची स्पर्धा लागली आहे. आता कोण किती पाण्यात आहे, याची प्रचितीच येणार आहे. दरम्यान रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून ठिकठिकाणच्या मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सर्वत्र ईव्हीएमद्वारे मतदान झाले असल्याने वेगाने मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने मतमोजणीची चोख व्यवस्था केली असून, सकाळी 1क् वाजेर्पयत निकालांचा कल कोणाच्या बाजूने आहे, हे स्पष्ट होईल.
 
माहीम
नितीन सरदेसाई (मनसे)
सदा सरवणकर (शिवसेना)
वांद्रे पश्चिम
बाबा सिद्दिकी (काँग्रेस)
आशिष शेलार (भाजपा)
कलिना
कृपाशंकर सिंह (काँग्रेस)
संजय पोतनीस (शिवसेना)
चंद्रकांत मोरे (मनसे)
घाटकोपर प.
राम कदम (भाजपा)
सुधीर मोरे (शिवसेना)
दिलीप लांडे (मनसे)
विलेपार्ले
कृष्णा हेगडे (काँग्रेस)
शशिकांत पाटकर (सेना)
पराग अळवणी (भाजपा)
अंधेरी पूर्व
सुरेश शेट्टी (काँग्रेस)
रमेश लटके (शिवसेना)
 
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान निवडणूक साहित्याची ने-आण करण्यासह कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अंधेरी, कुर्ला, घाटकोपर आणि चांदिवली येथील काही मार्गात बदल करण्यात आले आहेत.
 
अंधेरी ते कुर्ला रोडकडून दक्षिण बाजूस समाप्त झालेला गुंदवली, गावठाण, महानगरपालिका शाळा, ए.के. रोड, अंधेरी पूर्व, मुंबई शाळेसमोरील रस्ता मातोश्री अपार्टमेंट ते पप्पू डेकोरेटर्स, मुंबई महानगरपालिका चौकीर्पयत स्थवर्व प्रकारच्या वाहनांसाठी 23.00 वाजेर्पयत तात्पुरती प्रवेशबंदी राहील. 
 
1अंधेरी ते कुर्ला रोडवर रमेश मोरे चौक ते अंधेरी टॅप जंक्शन पश्चिम द्रुतगती महामार्गार्पयत संपूर्ण रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांकरिता 19 ऑक्टोबर सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 16 वाजेर्पयत तात्पुरत्या कालावधीकरिता बंद राहील. 
2घाटकोपर पश्चिमेलाही मतमोजणी केंद्र 
असून, त्यामुळे या परिसरातील वाहतूक मार्गावरही ता2त्पुरती बंदी घालण्यात आली आहे. आर.बी. कदम मार्गावरून असल्फाकडे जाणारी वाहतूक डावीकडे वळण घेऊन राम जोशी मार्गाने मार्गक्रमित होईल. 
3असल्फा जंक्शनकडून आर.बी. कदम मार्गे कर्मवीर भाऊराव पाटील, समाज केंद्र मतमोजणी केंद्र क्रमांक 169कडे येणारी वाहतूक सिद्धी गणोश मंदिर येथून उजवे वळण घेऊन राम जोशी मार्गाने मार्गक्रमित होईल आणि असल्फा जंक्शनकडून आर.बी. कदम मार्गे कर्मवीर भाऊराव पाटील, समाज केंद्र मतमोजणी केंद्र क्रमांक 169कडे येणा:या जड वाहनांना हा रस्ता बंद राहील.  
4चांदिवली भागातही विद्याविहार स्टेशनकडून दक्षिण वाहिनीवरून प्रिमियर रोडने चांदिवली विधानसभा मतमोजणी केंद्र क्रमांक 168च्या दिशेने येणारी वाहतूक भारतीय स्टेट बँक, इलेट्रिक पोल क्रमांक 77/78 येथून उत्तर वाहिनीवरून मार्गक्रमित करण्यात येईल आणि प्रिमियर रोडवरील भारतीय स्टेट बँक ते एसटी कार्यशाळा दक्षिण वाहिनीचा भाग हा संपूर्णपणो बंद राहील.
 
गोरेगाव
सुभाष देसाई (शिवसेना)
शशांक राव (राष्ट्रवादी)
भांडुप
शिशिर शिंदे (मनसे)
अशोक पाटील (शिवसेना)
श्याम सावंत (काँग्रेस)
विक्रोळी
मंगेश सांगळे (मनसे)
संजय पाटील (राष्ट्रवादी)
मागाठाणो
प्रवीण दरेकर (मनसे)
प्रकाश सुर्वे (शिवसेना)
दहिसर
विनोद घोसाळकर (शिवसेना)
शुभा राऊळ (मनसे)
शीतल म्हात्रे (काँग्रेस)
मनीषा चौधरी (भाजपा)
बोरीवली
विनोद तावडे (भाजपा)
उत्तम अग्रवाल (शिवसेना)
शिवडी
बाळा नांदगावकर (मनसे)
अजय चौधरी (शिवसेना)
धारावी
वर्षा गायकवाड (काँग्रेस)
बाबूराव माने (शिवसेना) 
 

 

Web Title: The intimidation of the candidates increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.