मंडई उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान
By admin | Published: September 19, 2016 02:00 AM2016-09-19T02:00:35+5:302016-09-19T02:00:35+5:30
क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमधील गाळेधारकांची सर्वसाधारण सभा शुक्रवारी मंडईच्या आवारामध्ये घेण्यात आली.
मुंबई : क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमधील गाळेधारकांची सर्वसाधारण सभा शुक्रवारी मंडईच्या आवारामध्ये घेण्यात आली. त्यावेळी मंडईमधून ५0 फूट रस्ता सेनापती बापट मार्ग ते न.चि.केळकर मार्ग यांना जोडण्याचे महापालिकेने नियोजित केले आहे. यातून क्रांतिसिंह नाना पाटील मंडई आणि प्लाझा सिनेमानाचा भाग उध्वस्त करण्याचे कारस्थान पालिकेने रचल्याचे गाळेधारक शंकरराव पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
५0 फूट रस्ता नियोजित केल्याने मंडईच्या गाळेधारकांचे, कामगारांचे संसार उध्वस्त करण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. समाधान (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित नावाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मंजुर केलेली पुनर्विकास योजना नजीकरच्या भूभागावर राबविण्यात आलेली आहे. योजनेला नियमानुसार रस्ता नसून तरीही आराखडे मंजुर करण्यात आलेले आहेत. रस्ता नसल्याने मंडईमधूनच रहिवासी दुचाकी चालवून गाळेधारक व मंडईमधील ग्राहकांच्या जीवाशी खेळत असल्याचे सांगण्यात आले. पाटील व अन्य गाळेधारकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी नियोजित रस्त्याला स्थगिती देऊन अहवाल सादर करण्यासही कळविले आहे.