आंतरजातीय विवाह केल्याने निर्घृण खून

By admin | Published: July 22, 2016 12:45 AM2016-07-22T00:45:06+5:302016-07-22T00:45:06+5:30

भाचीने आंतरजातीय विवाह केला याचा राग धरून कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे मामाच्या मुलाने ७ साथीदारांसमवेत तरुणाचा गळा कापून व गोळ्या घालून निर्घृण खून केला.

Intruder murder due to inter-caste marriages | आंतरजातीय विवाह केल्याने निर्घृण खून

आंतरजातीय विवाह केल्याने निर्घृण खून

Next


लोणी काळभोर : भाचीने आंतरजातीय विवाह केला याचा राग धरून कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथे मामाच्या मुलाने ७ साथीदारांसमवेत तरुणाचा गळा कापून व गोळ्या घालून निर्घृण खून केला. ही घटना काल मध्यरात्री उघडकीस आली.
नागेश ऊर्फ दादा अशोक लोंढे (वय ३२) यांचा खून झाला. त्यांची पत्नी प्रियांका यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी संजय मोरे (वय ४६), अजिंक्य मोरे ( वय २०, दोघेही रा. प्रयागधाम), दीपक घटमाळे (वय २२), निखिल मदगडे ( वय २३) व महेश मदगडे (२०, तिघेही रा. कोरेगाव मूळ) यांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००९ मध्ये प्रियांका व नागेश यांनी आंतरजातीय विवाह केला होता. तेव्हापासूनच प्रियांकाचे मामा संजय मोरे व त्यांचा मुलगा मच्छिंद्र हे तिच्यावर व तिच्या आईवर चिडून होते. २० जुलै रोजी मध्यरात्रीपर्यंत नागेश घरी न आल्याने प्रियांकाने फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिचा भाऊ अक्षयसह शोध घेण्यास निघाले. नागेश यांचा खून झाल्याचे दिसून आले. (वार्ताहर)
मुलीवर प्राणघातक हल्ला
घोडेगाव : एकतर्फी प्रेमातून कोटमदरा येथे राहणाऱ्या १८ वर्षांच्या मुलीवर एका अल्पवयीन तरुणाने ब्लेडने गळ्यावर मारुन प्राणघातक हल्ला केला. मुलीच्या गळ्याला आठ टाके पडले असून या हल्ल्यात ती बचावली. मुलगी प्रेमाला प्रतिसाद देत नसल्याने हल्ला केल्याचे तपासात पुढे आले आहे. आरोपी मुलीच्या घराशेजारीच राहत होता. मुलगी त्यांच्या किरणा दुकानात बसली असताना आरोपीने दाराची कडी वाजवली, दार उघडल्याबरोबर तिच्या गळ्यावर ब्लेडने हल्ला केला.

Web Title: Intruder murder due to inter-caste marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.