अंतर्मुख करणारी साहित्यनिर्मिती व्हावी - डॉ. जाधव
By admin | Published: December 27, 2016 01:00 AM2016-12-27T01:00:07+5:302016-12-27T01:00:07+5:30
‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजामध्ये रुजत नाही, जातीअंत होत नाही, तोवर भारत पूर्णत: विकास साधू शकणार नाही. बदलत्या काळाचा स्वीकार करत, सामाजिक भान ठेवत
पुणे : ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समाजामध्ये रुजत नाही, जातीअंत होत नाही, तोवर भारत पूर्णत: विकास साधू शकणार नाही. बदलत्या काळाचा स्वीकार करत, सामाजिक भान ठेवत लेखकांनी भूमिका ठामपणे मांडाव्यात. समाजाला दिशा देण्यासाठी अंतर्मुख, अस्वस्थ करणाऱ्या साहित्याची निर्मिती होण्याची गरज आहे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मनोहर जाधव यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान यांच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. जाधव बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांना यावेळी ‘प्रा. रा. ग. जाधव साहित्य साधना पुरस्कार’,ने सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
साहित्याला समर्पित अशा प्रा. रा. ग. जाधव यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळावा, याचा आनंद आहे. विचाराच्या आधारे आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. सामान्यत: आपण परिवर्तनवादी असतो. मात्र, आपल्या जातीत किंवा धर्मात बंदिस्त राहतो. त्यामुळे आपल्या समतेच्या कक्षा रुंदावत ठेवल्या पाहिजेत. त्यातून खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या संमेलनाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. - डॉ. नागनाथ कोतापल्ले, ज्येष्ठ साहित्यिक