‘त्या’ विद्यार्थ्यांकडून अवैध शुल्क वसुली
By admin | Published: July 25, 2016 05:04 AM2016-07-25T05:04:20+5:302016-07-25T05:04:20+5:30
प्रवेश घेतेवेळी शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करूनये, असे निर्देश राज्य शासनाचे असले तरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या काही संलग्नित
योगेश पांडे, नागपूर
प्रवेश घेतेवेळी शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करूनये, असे निर्देश राज्य शासनाचे असले तरी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या काही संलग्नित महाविद्यालयांनी ते सर्रासपणे धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे. या महाविद्यालयांकडून प्रवेशाच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करण्यात येत असून सामाजिक न्याय खात्याकडे यासंदर्भात तक्रारी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शैक्षणिक संस्थांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून प्रवेश घेतेवेळी शुल्क वसूल करू नये, असे निर्देश २१ एप्रिल १९८७ रोजी उच्च न्यायालयाने दिले होते. समाजकल्याण विभागानेदेखील यासंदर्भात २००३ साली परिपत्रक काढले होते. राज्य शासनाकडून वारंवार यासंदर्भात सूचना देण्यात येतात. या शुल्काची प्रतिपूर्ती केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीद्वारे करण्यात येते.
नागपूर विद्यापीठात सध्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू आहेत. काही महाविद्यालयांत प्रवेशाच्या वेळी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क भरायला लावण्यात येत आहे. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर शुल्क परत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात येत आहे.