अवैध होर्डिग्ज् दिसली, की करा कॉल
By admin | Published: August 8, 2014 01:56 AM2014-08-08T01:56:58+5:302014-08-08T01:56:58+5:30
यापुढे अवैध होर्डिग्ज् दिसली की थेट महापालिकेकडे तक्रार करून असे होर्डिग्ज् तत्काळ काढता येऊ शकतील़ तशी व्यवस्थाच उच्च न्यायालयाने गुरुवारी केली आह़े
Next
>मुंबई : यापुढे अवैध होर्डिग्ज् दिसली की थेट महापालिकेकडे तक्रार करून असे होर्डिग्ज् तत्काळ काढता येऊ शकतील़ तशी व्यवस्थाच उच्च न्यायालयाने गुरुवारी केली आह़े
महत्त्वाचे म्हणजे अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस अवैध होर्डिग्ज् लावणा:यांवर गस्त घालणा:या पोलिसांनी लक्ष ठेवावे व अवैध होर्डिग्ज् लावली जात असल्यास त्यावर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत़ त्यामुळे अवैध होर्डिग्ज् लावणा:यांना चांगलीच चपराक बसली असून, आगामी विधानसभा निवडणूक व उत्सवांमध्ये असे होर्डिग्ज् लागणार नाहीत़ न्या़ अभय ओक व न्या़ ए़एस़ चांदूरकर यांच्या खंडपीठाने हे आदेश महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका, नगर परिषदा व
स्थानिक प्रशासनांना दिले आहेत़ यानुसार अवैध होर्डिग्ज् काढताना अधिका:यांना पोलीस संरक्षणही मिळणार आह़े विशेष म्हणजे अवैध होर्डिग्ज्बाबत जनजागृती करण्याचे निर्देश न्यायालयाने या प्रशासनांना दिले आहेत़ तसेच अवैध
होर्डिग्ज् लावणार की नाही याचा खुलासा काँग्रेस, मनसे, शिवसेना या पक्षांनी करावा़ तसेच निवणूक आयोगाने याचे प्रत्युत्तर सादर करावे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आह़े
या प्रकरणी मुंबईतील एका सामाजिक संघटनेने अॅड़ उदय वारूंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली असून, राज्यातील विविध सामाजिक संघटना व कार्यकत्र्यानी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत़ त्याची दखल घेत न्यायालयाने हे आदेश दिल़े दोन दिवस आदेश वाचनाचे काम सुरू होत़े यावरील पुढील सुनावणी 3क् सप्टेंबरला होणार आह़े (प्रतिनिधी)
न्यायालयाचे आदेश मुंबईत पालिकेने वॉर्डमधील
वरिष्ठ अधिका:याची नेमणूक करावी़ हा अधिकारी होर्डिग्ज्वर कारवाई करेल़ मुंबईबाहेर प्रशासनांनी असा अधिकारी नेमावा़ विभागात अवैध होर्डिग्ज् असल्यास त्याची जबाबदारी
या अधिका:याची असेल़
च्पोलीस आयुक्तांनी सह आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमून या कारवाईचा आढावा घ्यावा़ मुंबईबाहेर उप आयुक्त दर्जाचा अधिकारी हे काम करेल़
च्रात्रीच्या वेळेस गस्त घालणा:या पोलिसांनी अवैध होर्डिग्ज् लावणा:यांवर कारवाई करावी़ अवैध होडिर्ंग्ज् काढणा:या पथकाला पोलीस संरक्षण द्याव़े
च्तसेच तक्रार करण्यास टोल फ्री नंबर तयार करा़ अवैध होर्डिग्ज्बाबत जनजागृती करावी व ही सर्व माहिती नागरिकांना द्यावी़