राज्यातील निवडणुकांची ‘एसटी’वर स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 03:44 AM2017-02-15T03:44:28+5:302017-02-15T03:44:28+5:30

राज्यात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांच्या कामांसाठी एसटी महामंडळाने साथ देण्याचा निर्णय

Invasion of state elections 'ST' | राज्यातील निवडणुकांची ‘एसटी’वर स्वारी

राज्यातील निवडणुकांची ‘एसटी’वर स्वारी

Next

सुशांत मोरे / मुंबई
राज्यात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुकांच्या कामांसाठी एसटी महामंडळाने साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून राज्यातील निवडणुकांसाठी यंदा ५,१00 एसटी बसेस आरक्षित केल्या आहेत. १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारीपर्यंत या एसटी आरक्षित असतील, अशी माहिती देण्यात आली.
कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याबरोबरच निवडणुकीत मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या मशिन, त्याचबरोबर अन्य कामांसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांची गरज भासते. त्यामुळे खासगी वाहने आरक्षित केली जातात, परंतु ही वाहने महागात पडत असल्याने, सार्वजनिक वाहने आरक्षित करण्यावर भर दिला जातो. या वेळी राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत असून, त्यामुळे निवडणूक कामांसाठी वाहनांची मोठी गरज भासणार आहे. हे पाहता, एसटी महामंडळाच्या बसेस मदतीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास ५,१00 बसेस निवडणूक कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. औरंगाबाद विभागात (औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड,उस्मानाबाद, लातूर, जालना)१,0१४ बस, नाशिक विभागासाठी (नाशिक, जळगाव, अहमदनगर) ८६0, मुंबई विभागासाठी (मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग) ७४३, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली) ३0१ बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत.
आरक्षित बसची तारीख
15 आणि 16 फेब्रुवारी - बीड, परभणी, औरंगाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा.
20 आणि 21 फेब्रुवारी - नाशिक, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, अमरावती.

Web Title: Invasion of state elections 'ST'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.