दलित हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्या

By Admin | Published: November 11, 2014 02:06 AM2014-11-11T02:06:11+5:302014-11-11T02:06:11+5:30

अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथील दलित हत्याकांडाप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा,

Investigate the Dalit massacre of the CBI | दलित हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्या

दलित हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे द्या

googlenewsNext
हायकोर्टात याचिका : 25 लाख नुकसानभरपाई द्या; मुख्यमंत्री प्रतिवादी
अमर मोहिते ल्ल मुंबई
अहमदनगर पाथर्डी तालुक्यातील जावखेडे येथील दलित हत्याकांडाप्रकरणी राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
ऐन दिवाळीत झालेल्या या हत्याकांडाने अवघा महाराष्ट्र हळहळला. सर्व स्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे. मारेक:यांच्या अटकेच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत. मात्र पोलिसांना अद्याप एकही मारेकरी न सापडल्याने ही याचिका दाखल झाली आहे.
प्रा. अनंत कदम, दीपक वाघमारे, प्रतीक कांबळे, सागर ङोंडे व सुनील पवार यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. दलित अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली दक्षता व देखरेख समिती योग्य प्रकारे काम करीत नसल्यानेच दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. दलित अत्याचार खटल्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना होणार होती. मात्र विशेष न्यायालयही अजून स्थापन झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या समितीची बैठक घ्यावी, असे याचिकाकत्र्याचे म्हणणो आहे.  मुंबईसह राज्यातील आंदोलनांमुळे सर्वसामान्यांना त्रस होत आहे. मात्र हे टाळण्यासाठी दलितांवरील अत्याचार रोखणो आवश्यक आहे. त्या दृष्टीने न्यायालयाने योग्य ते आदेश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे. याचिकेत मुख्यमंत्री, गृहविभाग, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, अहमदनगर पोलीस अधीक्षक व उप पोलीस अधीक्षक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर तातडीने सुनावणी होण्यासाठी अॅड. सदावर्ते 
मंगळवारी) न्यायालयाचे लक्ष वेधणार आहेत. (प्रतिनिधी)
 
पाथर्डी हत्याकांडाविरोधात धरणो आंदोलन
मुंबई : पाथर्डी हत्याकांतील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करीत ब्लू टायगर संघटनेने सोमवारी आझाद मैदानात धरणो आंदोलन केले. येत्या 1क् दिवसांत प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाही, तर मुंबई बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
अत्याचाराच्या या घटनेमुळे राज्यभर दलित तरुणांत असंतोषाची लाट पसरली आहे.  या  प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी संघटनेचे विलास रुपवते यांनी केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मागील काही महिन्यांतील दलित अत्याचाराच्या घटना पाहता या जिल्हा अत्याचारग्रस्त जिल्हा म्हणून घोषित करण्याची मागणीही आंदोलनकत्र्यानी केली. अत्याचारात मृत्यू पावलेल्या जाधव कुटुंबातील नातेवाइकांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी संघटनेने केली आहे. या प्रकरणाचा खटला तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. सोशल नेटवर्किग साइट्सवर एकत्र आलेल्या काही तरुणांनी या संघटनेची स्थापना केली आहे. 1क् दिवसांत संघटनेने केलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाही, तर 21 नोव्हेंबरला मुंबई बंदचा इशारा संघटनेने दिला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Investigate the Dalit massacre of the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.