हल्दीरामच्या खाद्यपदार्थांची चौकशी करा
By admin | Published: July 9, 2015 02:17 AM2015-07-09T02:17:16+5:302015-07-09T03:07:58+5:30
मॅगीपाठोपाठ राज्यात हल्दीरामच्या सर्व खाद्यपदार्थांची चौकशी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ला दिले.
मुंबई : मॅगीपाठोपाठ राज्यात हल्दीरामच्या सर्व खाद्यपदार्थांची चौकशी करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ला दिले.
अमेरिकेत हल्दीरामच्या खाद्यपदार्थांत कीटकनाशकांचे प्रमाण अधिक आढळल्याने व विषाणू आढळून आल्याने त्यावर बंदी घालण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने अमेरिकेप्रमाणे राज्यातही हल्दीराम उत्पादनात कीटकनाशक आणि विषाणू आहेत का, याची चौकशी करण्यात येणार आहे. याखेरीज अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदींनुसार खाद्य तेलाची प्रत्येकवेळी नव्या डब्यात पॅक करणे गरजेचे आहे. मात्र खाद्य तेलाचे रिपॅक केले जाते. हा जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असून, याची चौकशी करण्याचे निर्देशही ठाकूर यांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)