‘त्या’ पैशांचा तपास आयकर विभागाकडे
By admin | Published: October 13, 2014 05:29 AM2014-10-13T05:29:21+5:302014-10-13T05:29:21+5:30
भांडुप राष्ट्रवादीचे एल. बी. सिंग यांच्या वाहनातून जप्त करण्यात आलेल्या १८ लाखांच्या बेहिशेबी रोकडप्रकरणी सिंग यांचे स्वीय साहाय्यक पारसनाथ यादव आणि वाहक कुंडेश्वर सहाने यांना पवई पोलिसांनी अटक केली
मुंबई : भांडुप राष्ट्रवादीचे उमेदवार एल. बी. सिंग यांच्या वाहनातून जप्त करण्यात आलेल्या १८ लाखांच्या बेहिशेबी रोकडप्रकरणी सिंग यांचे स्वीय साहाय्यक पारसनाथ यादव आणि वाहक कुंडेश्वर सहाने यांना पवई पोलिसांनी अटक केली
होती.
वाहनात सापडलेल्या पैशांशी माझा काहीही संबंध नसल्याचा दावा सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी आयकर विभागाकडून आता कसून चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सिंग यांच्या फोर्ड फिएस्टा या कारमधून सिंग यांचे स्वीय साहाय्यक पारसनाथ बाबूराव यादव जात असताना गस्तीवर असलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या भरारी पथकाने त्यांना अडवून त्यांच्याकडे चौकशी केली. वाहनाच्या झडतीमध्ये सिंग यांचे प्रसिद्धी पत्रक, मतदार कार्ड तसेच पक्षाच्या स्कार्फसह वाहकाच्या सीटखालून १८ लाखांची रोकड जप्त केली होती. मात्र या रकमेप्रकरणी आयकर विभागाचे अधिकारी यादव आणि सहानेकडे कसून चौकशी करीत आहे. सिंग यांच्या वाहनात ही रोकड मिळाल्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. (प्रतिनिधी)