ड्रग्ज रॅकेटची अमेरिकन संस्थेकडून चौकशी

By admin | Published: May 7, 2016 01:55 AM2016-05-07T01:55:13+5:302016-05-07T01:55:13+5:30

सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. या कंपनीतून ठाणे पोलिसांनी इफे ड्रीन, सुडोइफेड्रीन तसेच अ‍ॅसेटिक अनहायड्रेड असा अडीच हजार कोटींचा २३ टन अमली पदार्थांचा साठा

Investigation by the American Society of Drugs Racket | ड्रग्ज रॅकेटची अमेरिकन संस्थेकडून चौकशी

ड्रग्ज रॅकेटची अमेरिकन संस्थेकडून चौकशी

Next

ठाणे : सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लि. या कंपनीतून ठाणे पोलिसांनी इफे ड्रीन, सुडोइफेड्रीन तसेच अ‍ॅसेटिक अनहायड्रेड असा अडीच हजार कोटींचा २३ टन अमली पदार्थांचा साठा हस्तगत करून कंपनीच्या संचालकांसह सात जणांना अटक केल्याने अमेरिकेच्या युनायटेड स्टेटस डिपार्टमेंट आॅफ जस्टीस ड्रग इन्फोर्समेंटकडूनही या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तशी परवानगी ठाणे पोलिसांकडे अमेरिकेने मागितली आहे. भारतासह सहा देशांच्या प्रमुखपदाची जबाबदारी असलेले ड्रग्ज इन्फोर्समेंटचे डेरेक ओडने यांनी यासंबंधी अलीकडेच ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी पत्र देऊन बातचीत करण्याची परवानगी मागितली होती.

Web Title: Investigation by the American Society of Drugs Racket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.