व्यापमंची चौकशी सीबीआयकडे

By admin | Published: July 10, 2015 04:08 AM2015-07-10T04:08:49+5:302015-07-10T04:08:49+5:30

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मध्य प्रदेशातील कोट्यवधीच्या आणि तेवढ्याच गूढ व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत

The investigation of the business was done by the CBI | व्यापमंची चौकशी सीबीआयकडे

व्यापमंची चौकशी सीबीआयकडे

Next

नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या मध्य प्रदेशातील कोट्यवधीच्या आणि तेवढ्याच गूढ व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले.
सर्व प्रकरणे येत्या सोमवारी सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात येतील आणि तपास संस्था २४ जुलैला यासंदर्भात आपला अहवाल न्यायालयासमक्ष
सादर करेल, असे सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
------------
या घोटाळ्यातील आणखी एका साक्षीदाराचा मृत्यू झाला असल्याची माहिती विशेष न्यायालयाला देण्यात आली आहे. आतापर्यंत या घोटाळ्याची चौकशी करीत असलेल्या राज्य पोलिसांच्या एसटीएफने न्यायालयाला सांगितले की, ३५वर्षीय संजयसिंग यादव यांचे ८ फेब्रुवारीला भोपाळच्या एका खासगी रुग्णालयात आजारपणात निधन झाले. मागील दोन वर्षांत या घोटाळ्याशी संबंधीत लोकांपैकी ५० लोकांनी जीव गमावला.
------------
 संबंधित सर्व प्रकरणे आणि कथित लोकांच्या मृत्यूचा तपास न्यायालयाने सीबीआयकडे सुपुर्द केला आहे. मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांना पदावरून हटविण्याच्या मागणीवरील याचिकेवरून केंद्र आणि राज्य सरकारसोबतच राज्यपालांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

Web Title: The investigation of the business was done by the CBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.