तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

By admin | Published: July 23, 2014 02:44 AM2014-07-23T02:44:05+5:302014-07-23T02:44:05+5:30

केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांच्या केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आह़े

Investigation on the Economic Offenses Wing | तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

Next
नाशिक : केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांच्या केलेल्या कोटय़वधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणाचा तपास शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आह़े यासाठी एका विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली असून, यामध्ये आठ जणांचा समावेश आह़े 
फसवणुकीतील तक्रारदारांच्या संख्येत वाढ होत असून, मंगळवारी आडगाव पोलीस ठाण्यात 359 तक्रारदारांनी 7 कोटी 34 लाख 71 हजार 5क्क् रुपयांच्या फ सवणुकीची तक्रार केली़ 
त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात आतार्पयत 5558 तक्रारदारांनी तक्रारी केल्या असून, फसवणुकीची एकूण रक्कम 148 कोटी 79 लाख 4 हजार 3क्क् रुपयांवर पोहोचली आह़े (प्रतिनिधी)
 
तपासासाठी विशेष पथक
तपासासाठी पोलीस आयुक्तालयाने विशेष पथक स्थापन केले आह़े त्यामध्ये 1 पोलीस निरीक्षक, 2 सहायक पोलीस निरीक्षक व 5 कर्मचा:यांचा समावेश आह़े तक्रारदार आपली तक्रार आडगाव पोलीस ठाणो, तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडे करू शकतात़, असे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणो म्हणाले.
 
जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा  
केबीसीमध्ये फ सवणूक झालेले मराठवाडा, विदर्भ, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांतील सुमारे पाच हजार गुंतवणूकदार बुधवारी गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत़ या मोर्चाचे नेतृत्व छावा संघटना व संभाजी ब्रिगेड करणार आह़े
 
‘केबीसी’ गुंतवणुकीत नगर अग्रभागी
च्अल्पावधीतच तिप्पट रकमेचे आमिष दाखवून हजारो सभासदांना गंडविणा:या केबीसी कंपनीतील गुंतवणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील सभासदांचा सर्वाधिक समावेश असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर जाळे पसरलेल्या या कंपनीचे ठाणो, मुंबई तसेच कल्याणर्पयत धागेदोरे पसरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
च्आडगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरार्पयत जवळपास 5,17क् सभासदांनी तक्रारी दाखल केल्या. फसवणुकीचा आकडा 141 कोटी रुपयांर्पयत गेला आहे.

 

Web Title: Investigation on the Economic Offenses Wing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.