बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीचा तपास सुरूच

By admin | Published: April 6, 2017 05:27 AM2017-04-06T05:27:04+5:302017-04-06T05:27:04+5:30

कृपाशंकर सिंह बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचा(ईडी) तपास सुरूच असल्याची माहिती बुधवारी ईडीने उच्च न्यायालयाला दिली

Investigation of ED in connection with disproportionate assets case | बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीचा तपास सुरूच

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी ईडीचा तपास सुरूच

Next

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचा(ईडी) तपास सुरूच असल्याची माहिती बुधवारी ईडीने उच्च न्यायालयाला दिली, तसेच झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा हवाला प्रकरण व या याचिकेमध्ये सिंग यांची नमूद करण्यात आलेली संपत्ती वेगवगेळी आहे, अशी माहितीही ईडीने उच्च न्यायालयाला दिली.
लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने योग्य तपास केला नसल्याने, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका तुलसीदास नायर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारच्या सुनावणीत ईडीतर्फे अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी या प्रकरणी ‘ईसीआयआर’ दाखल करण्यात आला असून, तपास सुरू असल्याची माहिती खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Investigation of ED in connection with disproportionate assets case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.