‘त्या’ गळक्या बंधाऱ्याची चौकशी
By admin | Published: July 22, 2016 02:19 AM2016-07-22T02:19:40+5:302016-07-22T02:19:40+5:30
लाखो रुपये खर्चुन बांधलेल्या तालुक्यातील दोन बंधाऱ्यांना गळती लागल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच जिल्हा कृषी अधिक्षकांनी मोखाडा कृषी विभागाला चौकशीचे आदेश दिले
मोखाडा : लाखो रुपये खर्चुन बांधलेल्या तालुक्यातील दोन बंधाऱ्यांना गळती लागल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच जिल्हा कृषी अधिक्षकांनी मोखाडा कृषी विभागाला चौकशीचे आदेश दिले असून तशी नोटीस बजावली आहे.
मोखाडा कृषी विभागाने लाखो रुपये खर्चून खोडाळा जवळील जोगलवाडी व मोहिते कॉलेज लगत बांधलेल्या बंधार्ऱ्यांना पहिल्याच पावसात गळती लागल्याने निकृष्ट बांधकाम प्रकरण चव्हाट्यावर आले असून याबाबत लोकमत मध्ये
दिनांक २० जुलै रोजी दोन बंधार्ऱ्यांना लागली गळती या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच यांची तातडीने पालघर जिल्हा कृषी अधीक्षक आर. जे. पाटील यांनी दखल घेतली. त्यांनी मोखाडा कृषी विभागाला त्या गळती लागलेल्या बंधाऱ्यांची पहाणी करण्याचे आदेश दिले असून नोटीस बजावून करवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
दोन्ही बंधाऱ्यांवर अनुक्रमे १६ व १४ लाख खर्च झाले आहेत. अधिकाऱ्यांच्या टक्केवारीमूळे याकडे दुर्लक्ष झाल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होऊन या बंधार्यांना गळती लागली आहे. हे काम चालू असताना निकृष्ट काम केले जात असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या. परंतु तालुका कृषी अधिकारी वाणी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. यामुळे ठेकेदारासह आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होते आहे. (वार्ताहर)