वसईतील पॅराशूटचा एटीएसकडून तपास
By admin | Published: January 30, 2016 01:46 AM2016-01-30T01:46:54+5:302016-01-30T01:46:54+5:30
वसईच्या आकाशात दिसलेल्या पॅराशुटचा एव्हिएशन डायरेक्टर जनरल, स्थानिक पोलीस आणि एटीएस यांच्याकडून तपास करण्यात येत आहे.
वसई : वसईच्या आकाशात दिसलेल्या पॅराशुटचा एव्हिएशन डायरेक्टर जनरल, स्थानिक पोलीस आणि एटीएस यांच्याकडून तपास करण्यात येत आहे.
एअर इंडियाच्या विमानातील कॉकपीट क्रुने सकाळी साडेनऊच्या सुमारास वसई किनारपट्टीपासून १८ कि. मी. (५ नॉटीकल माईल) अंतरावर ६ हजार फूट उंचीवर लाल, निळे, पिवळे आणि हिरव्या रंगाचे चार संशयास्पद पॅराशुट दिसल्याची तक्रार एअर टॅ्रफिक कंट्रोल रुमकडे केली होती. एअर क्रमांक ३१९ हे विमान मुंबईहून चेन्नईला निघाले असताना हे पॅराशूट आकाशात दिसून आले.
याप्रकरणी स्थानिक पोलीस आणि एटीएसकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.
मुंबईच्या आकाशात संशयास्पद पॅराशुट दिसण्याची जानेवारी महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या आधी पवनहंस हॅलिकाप्टरच्या पायलटने पॅराशुट दिसल्याची तक्रार केली होती. दुसऱ्या एका घटनेत एअर इंडियाच्या प्रवाशांनी पॅराशुट बघितल्याची तक्रार केली
होती. (प्रतिनिधी)