मल्टिस्टेट सोसायटींची होणार तपासणी

By admin | Published: February 2, 2016 04:03 AM2016-02-02T04:03:45+5:302016-02-02T04:03:45+5:30

राज्यातील काही मल्टिस्टेट सोसायटींबाबतच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने सर्वच २६१ मल्टिस्टेटची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत

The investigation will be done by the multistate societies | मल्टिस्टेट सोसायटींची होणार तपासणी

मल्टिस्टेट सोसायटींची होणार तपासणी

Next

अरुण बारसकर,  सोलापूर
राज्यातील काही मल्टिस्टेट सोसायटींबाबतच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने सर्वच २६१ मल्टिस्टेटची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत. फेब्रुवारीअखेरपर्यंत अहवाल सादर करण्याच्या सूचना निबंधकांना दिल्या आहेत.
केंद्रीय निबंधकांनी मल्टिस्टेट सोसायटी (बहुराज्य सहकारी संस्था) अधिनियम २००२नुसार राज्यात मल्टिस्टेट काढण्यास परवानगी दिली. हा.. हा.. म्हणता राज्यात मल्टिस्टेट सोसायट्या स्थापन झाल्या. राज्यात अशा सोसायट्यांची संख्या २६१ इतकी आहे. राज्यात या संस्था नसल्या तरी काही जिल्ह्यांतच यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. राज्यातील काही मल्टिस्टेट स्थापन झाल्या व बंदही पडल्या. यात अनेकांचा पैसा गुंतला आहे. सोसायट्यांबाबतच्या तक्रारींची चौकशी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. यामुळेच हे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The investigation will be done by the multistate societies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.