म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरक्षित, लाभदायक

By Admin | Published: May 14, 2017 12:43 AM2017-05-14T00:43:18+5:302017-05-14T00:43:18+5:30

देशात उद्योग-व्यवसाय वाढत असताना लोकांची मिळकतही वाढली आहे

Investing in a mutual fund secure, profitable | म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरक्षित, लाभदायक

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक सुरक्षित, लाभदायक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशात उद्योग-व्यवसाय वाढत असताना लोकांची मिळकतही वाढली आहे; मात्र अर्थव्यवस्थेतील चढ-उतारामुळे नागरिकांमध्ये जीवनातील गरजा पूर्ण करण्याबाबत चिंता पसरली आहे. घामाचा पैसा कुठे गुंतविल्याने अधिक लाभ मिळेल, हा प्रश्न आहे. अशावेळी म्युच्युअल फंड हा सर्वाधिक सुरक्षित, लाभदायक आणि विश्वासकारक गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे प्रतिपादन म्युच्युअल फंड तज्ज्ञ सचिन जोगळेकर, अरविंद परांजपे आणि आणि रिलायन्स इनव्हेस्टर गाइडन्सच्या रिस्क मॅनेजमेंटचे हेड मिलिंद नेसरीकर यांनी केले.
लोकमत आणि रिलायन्स म्युच्युअल फंडच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तुमच्या ‘आर्थिक यशाची गुरुकिल्ली’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.
ते म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात स्वत:चे घर, मुलांचे शिक्षण, कारची खरेदी आणि देश-विदेशात पर्यटन करण्याचे स्वप्न असते. कमी वेळात अधिक लाभ मिळेल, अशा ठिकाणी घामाचा पैसा गुंतविण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. सामान्यपणे बँक एफडी, रिअल इस्टेट, सोनेखरेदी, शेअरमार्केट, विमा, म्युच्युअल फंड आदी पर्याय गुंतवणुकीसाठी निवडले जातात.
सुवर्णखरेदी किंवा रिअल इस्टेट क्षेत्र अस्थिर असल्याने या ठिकाणी गुंतवणूक करणे लाभदायक ठरताना दिसत नसून यातून मिळकत मिळेल याचा भरवसा नाही. दुसरीकडे बँकेत पैसा ठेवणे सुरक्षित असले, तरी मिळणाऱ्या व्याजापेक्षा महागाई अधिक वाढत असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी त्याबाबत अनुभव असणे अत्यावश्यक आहे. मात्र, हे गुंतागुंतीचे क्षेत्र असल्याने सामान्य नागरिकांना ते सहज शक्य नाही. विम्याचे क्षेत्रही तेवढे व्यापक आणि लाभदायक नाही.
अशा परिस्थितीत केवळ म्युच्युअल फंड असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने अधिक लाभ आणि तुमच्या पैशाला स्थायित्व मिळू शकते. याठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी व्यक्ती अनुभवी असणे गरजेचे नाही किंवा कमीतकमी पैशाची सीमा नाही. म्युच्युअल फंडवर भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्डाचे (सेबी) नियंत्रण असते. म्युच्युअल फंड विविध प्रकारात उपलब्ध असून, एकमुस्त किंवा थोड्या पैशातही फंड खरेदी केले जाऊ शकतात.
डेब्ट फंड, इक्विटी आणि एसआयपी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी विविध मार्ग उपलब्ध आहेत. पैसा गुंतविल्यानंतर संबंधित कंपनीचे अनुभवी फंड मॅनेजर गुंतवणूकदारांचा पैसा योग्य ठिकाणी खर्च करतात व यातून मिळणारा फायदा गुंतवणूकदारांनाच मिळतो. चांगला फायदा मिळविण्यासाठी नागरिकांनी धैर्य ठेवावे, असे आवाहन शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मेघना झुझम यांनी केले.
उपस्थितांच्या
प्रश्नांचे समाधान
कार्यशाळेच्या वेळी नागरिकांनी तज्ज्ञ मान्यवरांना म्युच्युअल फंडशी संबंधित प्रश्न विचारले. मान्यवरांनीही अतिशय विस्तारपूर्ण उत्तरे दिली. म्युच्युअल फंडचे प्रकार, लाभाची मर्यादा, कालावधी आदी शंकांचे या वेळी समाधान झाले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.
‘म्युच्युअल फंड डे’
प्रत्येक महिन्याच्या ७ला
रिलायन्सच्या वतीने अशी घोषणा करण्यात आली आहे की, प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला ‘म्युच्यअल फंड डे’ साजरा करण्यात येणार आहे.

Web Title: Investing in a mutual fund secure, profitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.