महाराष्ट्रात १ लाख कोटींची गुंतवणूक

By Admin | Published: October 18, 2015 02:20 AM2015-10-18T02:20:31+5:302015-10-18T02:20:31+5:30

महाराष्ट्रात कोणत्याही प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही. अनेक गुंतवणूकदार तयार आहेत. त्यांना फक्त ‘क्लीन प्रोजेक्ट’ची हमी हवी आहे. राज्यात एक लाख कोटी रुपयांची

Investment of 1 lakh crores in Maharashtra | महाराष्ट्रात १ लाख कोटींची गुंतवणूक

महाराष्ट्रात १ लाख कोटींची गुंतवणूक

googlenewsNext

नागपूर : महाराष्ट्रात कोणत्याही प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही. अनेक गुंतवणूकदार तयार आहेत. त्यांना फक्त ‘क्लीन प्रोजेक्ट’ची हमी हवी आहे. राज्यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत आहे. त्यामुळे एक लाख प्रत्यक्ष व तीन लाख अप्र्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. नागपुरातील मिहानसोबतच औरंगाबादलाही औद्योगिक दृष्टीने विकसित करण्याचा आपला मानस आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस सरकारची ३१ आॅक्टोबरला वर्षपूर्ती होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवारी विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी संवाद साधत सरकारची धोरणे व योजना मांडल्या. ते म्हणाले, फॉक्सॉन, सॉफ्टबँक व त्यांच्याशी संलग्न अलीबाबा आणि टॉरीगॉन यांसारख्या कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. सॉफ्टबँकला दोन हजार एकर जमिनीवर सोलर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकायचा आहे. सोबतच दोन हजार मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्पही उभारण्यास ते इच्छुक आहे. मिहानमध्येही एक मोठी आंतरराष्ट्रीय कंपनी येण्याची अपेक्षा आहे. ही कंपनी थायलंड व मलेशिया येथे सुरू असलेले काम बंद करून नागपुरात काम सुरू करण्यास तयार आहे.
अमरावती येथे इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क स्थापन करण्यात आले आहे. चंदीगडच्याही बऱ्याच कंपन्या येथे येण्यास इच्छुक आहेत. यवतमाळ, जळगाव, बुलडाणा, बीड, वर्धा यासह अन्य कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्येही असेच पार्क उभारले जातील. त्या अंतर्गत दोन लाख शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार केले जाईल. कंपनी या शेतकऱ्यांकडून थेट सोयाबीन खरेदी करेल.
(विशेष प्रतिनिधी)

१०० प्रकल्पांना निधी
राज्य मंत्रिमंडळाने पहिल्या वर्षात राज्यातील सर्व रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. सर्व आवश्यक प्रकल्पांना सरकारतर्फे निधी दिली जाईल. या वर्षी अशा १०० प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: Investment of 1 lakh crores in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.