नागपुरात सॅफ्रॉन कंपनीची गुंतवणूक!

By admin | Published: January 24, 2015 01:25 AM2015-01-24T01:25:34+5:302015-01-24T01:25:34+5:30

संरक्षण क्षेत्रातील सॅफ्रान या कंपनीने आपला प्रकल्प नागपूर येथे उभारावा, असे आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनी अधिकाऱ्यांशी दाओस येथील वर्ल्ड एकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत दिले.

Investment in Saprons company in Nagpur! | नागपुरात सॅफ्रॉन कंपनीची गुंतवणूक!

नागपुरात सॅफ्रॉन कंपनीची गुंतवणूक!

Next

मुंबई : संरक्षण क्षेत्रातील सॅफ्रान या कंपनीने आपला प्रकल्प नागपूर येथे उभारावा, असे आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनी अधिकाऱ्यांशी दाओस येथील वर्ल्ड एकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत दिले.
नागपुरात मिहान प्रकल्पाची उभारणी होत आहे. बोर्इंगच्या एमआरओची उभारणी होणार आहे. भारतीय वायुदलाच्या येथील देखभाल केंद्राच्याही बऱ्याच गरजा आहेत. या पार्श्वभूमीवर, सॅफ्रॉनला चांगली संधी आहे. राज्य सरकार त्यांच्या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
जेपी मॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिंटो यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. पिंटो यांनी भारतात कार्यविस्तार करण्याबरोबरच नोकरीच्या अधिक संधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. या संधी बँकींग सेवेचा विस्तार करून दिल्या जातील. मुंबईतही ही कंपनी आपला विस्तार करणार आहे. डीआजीओ कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी इव्हान मेजेंस यांच्याशी राज्यातील त्यांच्या उत्पादन विस्तार प्रकल्पावर चर्चा झाली. ज्या उत्पादनांना अधिक पाणी वापरावे लागेल, असे उद्योग मुबलक पाणी उपलब्ध असणाऱ्या ठिकाणी उभारावेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, सीआयआय अध्यक्ष अजय एस. श्रीराम यांनी देवेंद्र फडणवीस हे देशातील उत्कृष्ट मुख्यमंत्री असल्याचे गौरवोद्गार काढले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Investment in Saprons company in Nagpur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.