घोटाळ्यांमुळे गुंतवणूक कमी

By admin | Published: March 3, 2016 04:32 AM2016-03-03T04:32:47+5:302016-03-03T04:32:47+5:30

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे.

Investments are less scam than scams | घोटाळ्यांमुळे गुंतवणूक कमी

घोटाळ्यांमुळे गुंतवणूक कमी

Next

मुंबई : आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्णांमध्ये कठोर कारवाई होण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल तातडीने होणे आवश्यक आहे. आर्थिक घोटाळ्यांमुळे गुंतवणुकीवर विपरित परिणाम होत असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केले.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग व इंडियन बँक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या आर्थिक गुन्ह्यांविरोधी लढा या कार्यशाळेचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल
सिन्हा, अतिरिक्त संचालक वाय. सी. मोदी, इंडियन बँक असोसिएशनचे चेअरमन अश्वनी कुमार, व्हाईस चेअरमन अरुंधती भट्टाचार्य आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, सद्य:परिस्थितीमध्ये आर्थिक फसवणुकीच्या गुन्हेगारीत वाढ होत आहे. हे गुन्हेगार गुंतवणुकीच्या फसव्या योजनांतून मोठ्या प्रमाणात पैसा जमा करतात व परदेशात पळून जातात. अशा गुन्ह्यांचा तपास जलद गतीने होण्यासाठी तपासाच्या पध्दती बदलल्या पाहिजेत. गुंतवणूकदारांच्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीने होत आहे किंवा कसे हे तपासणेही महत्त्वाचे आहे.
जागतिक स्तरावर आर्थिक महासत्ता बनण्याकडे देशाची वाटचाल सुरु आहे. या काळात गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणे व त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही वित्त, तसेच कायदे व
सुव्यवस्था क्षेत्रातील यंत्रणांची
नैतिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
(विशेष प्रतिनिधी)1.20
लाख कोटींची फसवणूक
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक अनिल सिन्हा म्हणाले की, विभागाने २०१५ मध्ये बँक घोटाळयाच्या १७१ केसेसचा तपास केला असून ही रक्कम २० हजार ६४६ कोटी रु पये आहे. तर ग्राहकांची फसवणूक केलेल्या फसव्या योजनांच्या माध्यमातून गोळा केलेली रक्कम १ लाख २० हजार कोटी इतकी आहे.

Web Title: Investments are less scam than scams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.