गुंतवणूकदारांची फसवणूक; यश बिर्लांवर आरोपपत्र

By admin | Published: October 22, 2016 01:54 AM2016-10-22T01:54:43+5:302016-10-22T01:54:43+5:30

बिर्ला पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड (बीपीएसएल) कंपनीशी संबंधित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी यश बिर्ला, त्यांचा निकटचा साथीदार अनंत वर्धन आणि अन्य सात जणांवर

Investor fraud; Chargesheet on Yash Birla | गुंतवणूकदारांची फसवणूक; यश बिर्लांवर आरोपपत्र

गुंतवणूकदारांची फसवणूक; यश बिर्लांवर आरोपपत्र

Next

मुंबई : बिर्ला पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड (बीपीएसएल) कंपनीशी संबंधित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी यश बिर्ला, त्यांचा निकटचा साथीदार अनंत वर्धन आणि अन्य सात जणांवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. यश हे बिर्ला उद्योग समूहाचे चेअरमन आहेत.
सूत्रांनी सांगितले की, विशेष गुंतवणूकदार हित रक्षण न्यायालयात (एमपीआयडी) हे १३ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. यात फसवणूक (भादंवि कलम ४२0), गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात (४0९) व गुन्हेगारी कट (१२0 ब) हे आरोप ठेवण्यात आले. याशिवाय एमपीआयडी कायद्याचीही संबंधित कलमे लावण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बिर्ला हे कंपनीचे प्रमुख आहेत. त्यांना कंपनीतील अनियमिततांची माहिती होती. त्यामुळे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले. यापूर्वी केलेल्या चौकशीत त्यांनी आरोपांचा इन्कार केला होता. कंपनीच्या प्रवक्त्याकडून याबाबत प्रतिसाद मिळाला नाही.
सूत्रांनुसार, २00९ ते २0१३ या चार वर्षांत बीपीएसएलमधून १८0 कोटींचा गुंतवणूकदारांचा निधी आठ बँक खात्यांच्या माध्यमातून अन्य सहा कंपन्यांत वळता करण्यात आला होता. बिर्ला यांनी मात्र हे आरोप नाकारले होते. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षी पहिले आरोपपत्र दाखल केले होते. कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी पीव्हीआर मूर्ती यांना त्यात आरोपी करण्यात आले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

पैसा अन्यत्र वळविला
एफआयआरमधील माहितीनुसार, कंपनीने गुंतवणूकदारांना १0.७५ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून मुदत ठेवीची योजना आणली. या योजनेत ८ हजार गुंतवणूकदारांनी ३00 कोटी रुपये गुंतविले. योजनेनुसार १ वर्षानंतर पैसे परत देण्याऐवजी गुंतवणूकदारांचा पैसा कंपन्यांत वळविला. पोलिसांनी कंपनीच्या १0 मालमत्ता जप्त केल्या आहेत. मुंबईतील बिर्ला हाउस, एक प्लॉट आणि जुहूमधील तीन बंगले यांचा त्यात समावेश आहे. बिर्ला आणि सहयोगी कंपन्यांची डीमॅट खातीही जप्त केली आहेत.

Web Title: Investor fraud; Chargesheet on Yash Birla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.