आगीला आमंत्रण !

By admin | Published: November 3, 2016 05:45 AM2016-11-03T05:45:25+5:302016-11-03T05:45:25+5:30

दिवाळी सणात मुंबईकर आप्तेष्टांना नव्हे तर आगीलाही आमंत्रण देत आहेत.

Invitation to Fire! | आगीला आमंत्रण !

आगीला आमंत्रण !

Next


मुंबई : दिवाळी सणात मुंबईकर आप्तेष्टांना नव्हे तर आगीलाही आमंत्रण देत आहेत. फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रमाण अधिक असल्याने दरवर्षी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासन करते. तरीही यावर्षी दिवाळीच्या दिवसांत तब्बल ४२ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. पण असे असताना दुसरीकडे मात्र प्रदूषणाबाबत करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे दिवाळीच्या काळात होणाऱ्या प्रदूषणाच्या पातळीत घट झाली आहे. यंदा ही पातळी गेल्या दहावर्षांतील सर्वात कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिवाळी सणात मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत पारंपारिक फटाक्यांची जागा चीनी फटाक्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर रॉकेट, चीनी लॅम्प यामुळे आग लागण्याचा घटना घडू लागल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्या चार दिवसांमध्ये उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटना घडत असतात. मात्र यावेळी गोदामांना आग लागण्याचा जास्त घटना घडल्या आहेत. २५ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर आठ दिवसांमध्ये मुंबईत तब्बल ४२ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक आगीच्या घटना दिवाळीच्या प्रमुख चार दिवसांत घडल्या आहेत. आग लागण्याचे जास्त प्रमाण गोदाम आणि रिफ्यूजी एरिया (इमारतीमध्ये संकट समयी बचावासाठी असलेली मोकळी जाग) यामध्ये आहे. पी डीमेलो मार्गावरील साई निवास, मेहता मेन्शन, दारूखाना अशा काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या आगी लागल्या होत्या. मात्र ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर न्यायालय आणि प्रशासनाने घातलेले निर्बंध तसेच पर्यावरणप्रेमी संघटनांनी केलेली जनजागृती यामुळे मुंबईत यंदा ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा स्तर गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे उघड झाले आहे. (प्रतिनिधी)
>दोन इमारतींना आगी
या आठ दिवसात दोन गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागली होती. तर तीन ठिकाणी इमारतीच्या गच्चीवर, तर गोदाम आणि घरे आदी १७ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. ३० आॅक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
पश्चिम उपनगरात सर्वाधिक १८ ठिकाणी आगी लागल्या आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे समजते.
आगी लागल्याच्या घटना / २५ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबर
शहरात १२
पूर्व उपनगरात १२
पश्चिम उपनगरात १८

Web Title: Invitation to Fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.