RSS च्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना आमंत्रण 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 02:33 PM2018-05-28T14:33:10+5:302018-05-28T14:33:10+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समजते. तसेच, संघाकडून देण्यात आलेले आमंत्रण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारल्याचेही सांगण्यात येत आहे. 

Invitation to former President Pranab Mukherjee for RSS event | RSS च्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना आमंत्रण 

RSS च्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना आमंत्रण 

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला यंदा माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून समजते. तसेच, संघाकडून देण्यात आलेले आमंत्रण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी स्वीकारल्याचेही सांगण्यात येत आहे. 
येत्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघस्थानी येणार असल्याच्या या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून संघ स्वयंसेवकांमध्येदेखील या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आहे.
तृतीय वर्षाचा प्रशिक्षण वर्गाला संघात अतिशय महत्त्वाचे मानले जाते. नागपुरात १४ मे पासून वर्गाला सुरुवात झाली. या वर्गात देशभरातून ७०८ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर ७ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संघातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुखर्जी यांनी आमंत्रणाचा स्वीकारदेखील केला आहे. यावेळी मंचावर सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचीदेखील उपस्थिती राहणार असून ते स्वयंसेवकांना उद्बोधन करतील. दरम्यान, संघाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी पत्रिका छापण्यासाठी गेल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संघाकडून अधिकृत वक्तव्यदेखील टाळण्यात येत आहे. आता या कार्यक्रमाला खरोखर प्रणव मुखर्जी येतात का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

तृतीय वर्ष वर्ग असतो ‘खास’
संघाच्या प्रणालीत तृतीय वर्ष वर्गाचे महत्त्वाचे स्थान असते. दरवर्षी रेशीमबागला होणाऱ्या समारोप कार्यक्रमाला देशविदेशातील मान्यवरांची उपस्थिती असते. मागील वर्षी नेपाळचे निवृत्त लष्करप्रमुख जनरल रुक्मांगुद कटवाल हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्याअगोदर कर्नाटकच्या धर्मस्थळ येथील धर्माधिकारी डॉ.वीरेंद्र हेगडे, सुप्रसिद्ध स्तंभलेखक रंतिदेव सेनगुप्ता यांचीदेखील या कार्यक्रमाला उपस्थिती राहिली आहे.
 

Web Title: Invitation to former President Pranab Mukherjee for RSS event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.