मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना दिलं लग्नाचं आमंत्रण
By admin | Published: April 21, 2016 01:47 PM2016-04-21T13:47:32+5:302016-04-21T14:14:24+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आज गुरुवारी दुपारी माटुंगा ते चर्चगेट असा मुंबईच्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून उभ्याने प्रवास केला आणि आपले पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आज गुरुवारी दुपारी माटुंगा ते चर्चगेट असा मुंबईच्या लोकलच्या फर्स्ट क्लासमधून उभ्याने प्रवास केला आणि आपले पाय जमिनीवर असल्याचे दाखवून दिले. यावेळी त्यांच्यासोबत मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनीदेखील हा प्रवास केला. विशेष म्हणजे, कडेकोट बंदोबस्त असतानाही या वेळी प्रवाशांनी प्रभू यांच्याशी संवाद साधला, आणि रेल्वेमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. एका प्रवाशाने तर चक्क त्यांना घरच्या लग्नाचं आमंत्रण केलं आणि लग्नपत्रिकाही दिली. या आमंत्रणाचाही प्रभूंनी स्वीकार केला आहे.
माटुंगा वर्कशॉपच्या शताब्धी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी प्रभू मुंबईत आले आहेत. या कार्यक्रमानंतर त्यांनी दक्षिण मुंबईत जाण्यासाठी उपनगरीय रेल्वेला पसंती दिली आणि चारचौघांप्रमाणे त्यांनी हा प्रवास केला.
मुंबईच्या प्रवाशांच्या गंभीर समस्यांची जाण असलेल्या प्रभूंनी थेट मुंबईकरांसाठी काय करणार हे सांगितले नसले तरी काही महत्त्वपूर्ण मुद्यांचा उल्लेख केला...
(छायाचित्रे - सुशील कदम)
ते म्हणाले:
- रेलवेच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- राजकारणापलीकडे जाऊन रेलवेचा विकास झाला पाहिजे.
- या वर्षी 94000 कोटी रूपये गुंतवणूक केली.
- रेल्वेतील गुंतवणूक वाढवण्यावर भर.
- बुलेट ट्रेनमध्ये जवळपास 1 लाख कोटीची गुंतवणूक.
- महाराष्ट्राच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये 85000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.